Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत CM शिंदेंचा मोठा निर्णय; 'सह्याद्री’वरील बैठकीनंतर फडणवीसांचं सूचक ट्वीट

Maratha Reservation Latest Updates: तब्बल अडीज तास चाललेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली.
CM Shinde big decision regarding Maratha reservation devendra Fadnavis meeting on mumbai Sahyadri atithigruh
CM Shinde big decision regarding Maratha reservation devendra Fadnavis meeting on mumbai Sahyadri atithigruhSaam TV
Published On

Maratha Reservation Latest Updates: मराठ्यांना आरक्षण तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १२ दिवसांपासून जालना येथे आंदोलन करत आहेत. शुक्रवारी रात्री जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत एक बैठक पार पडली. सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्राबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. (Latest Marathi News)

CM Shinde big decision regarding Maratha reservation devendra Fadnavis meeting on mumbai Sahyadri atithigruh
Maharashtra Politics: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार? जयंत पाटील यांच्या विधानाने खळबळ

तब्बल अडीज तास चाललेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सरकार संवेदनशील आहे. त्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे. येत्या ३० दिवसांत मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

त्याचबरोबर मराठवाड्यातील मराठ्यांना विनाप्रयास कुणबी दाखले (Kunbi Certificate) उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून सकारात्मक प्रयत्न केले जातील. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीला मराठा समाजातील तज्ञांनी सहकार्य करावे, अशी विनंती अशी विनंती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाला केली.

सह्याद्री अतिथीगृहावरील या बैठकीला आंदोलकांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अर्जुन खोतकर, आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुख्य सचिव मनोज सौनिक यांची उपस्थिती होती.

दरम्यान, या बैठकीनंतर राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाला एक पत्रही देण्यात आलं. आज म्हणजेच शनिवारी शिष्टमंडळ हे पत्र जरांगे पाटील यांना देणार असून या पत्रानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकच सूचक ट्वीट केलं आहे. ‘मराठा समाजासाठी केलेल्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती यावेळी देण्यात आली आणि पुढील कार्यवाहीसंदर्भात सुद्धा सविस्तर चर्चा झाली’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com