Maharashtra Politics: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार? जयंत पाटील यांच्या विधानाने खळबळ

Ajit Pawar vs Sharad Pawar: शरद पवार यांच्या हातातून पक्षाचे नाव आणि चिन्ह जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
शरद पवार यांच्या हातातून राष्ट्रवादी पक्षचिन्ह आणि नाव जाणार? जयंत पाटलांच्या विधानाने खळबळ
शरद पवार यांच्या हातातून राष्ट्रवादी पक्षचिन्ह आणि नाव जाणार? जयंत पाटलांच्या विधानाने खळबळ Saam TV

Ajit Pawar vs Sharad Pawar Mla: एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गेलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फूट पडली असून अजित पवार यांच्यासह बहुतांश आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत. इतकंच नाही तर आम्हीच राष्ट्रवादी असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या हातातून पक्षाचे नाव आणि चिन्ह जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. (Latest Marathi News)

शरद पवार यांच्या हातातून राष्ट्रवादी पक्षचिन्ह आणि नाव जाणार? जयंत पाटलांच्या विधानाने खळबळ
Kunbi Certificate: कुणबी दाखला वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार, ५० हजारांची मागितली जातेय लाच; अनेकांच्या तक्रारी

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू जयंत पाटील यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. शिवसेनेप्रमाणेच आमचंही पक्षचिन्ह जाईल, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं, तेच राष्ट्रवादीच्या बाबत घडलं तर वावगं नाही, असंही ते म्हणाले.

शिवसेनेप्रमाणेच आमचंही नाव आणि पक्षचिन्ह जाईल: जयंत पाटील

आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह जाईल, असं वाटत असल्याचंही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. असं जर झाल्यास आम्ही शिवसेनेसारखा परत नव्याने आम्ही संघर्ष करू, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या या विधानामुळे घड्याळ पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव शरद पवार यांच्या हातातून जाणार का? अशीही चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना कशी गेली?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेत दोन गट (ठाकरे आणि शिंदे) तयार झाले. आपलीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे, असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला. पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. कोर्टाने या प्रकरणाची निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपावला.

शरद पवार यांच्या हातातून राष्ट्रवादी पक्षचिन्ह आणि नाव जाणार? जयंत पाटलांच्या विधानाने खळबळ
Pune News: दहीहंडी फुटताच आप्पा बळवंत चौकात राडा; ढोल ताशा पथक अन् गोविंदामध्ये तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

दरम्यान, निवडणूक आयोगाने यावर सुनावणी घेत शिवसेना पक्षाची ‘उद्देश व उद्दिष्ट’, ‘पक्षाची घटना’ व ‘बहुमत आणि विधिमंडळ’ या तीन निकषांचा विचार केला. त्याचबरोबर शिंद गटाला विधानसभेतील ५५ पैकी ४० आमदारांचा आणि लोकसभेतील १९ पैकी १३ खासदारांचा पाठिंबा असल्याने खरी शिवसेना ही शिंदेंचीच आहे, असं गृहीत धरत निकाल दिला.

शरद पवार यांच्या हातातून राष्ट्रवादी जाणार?

दरम्यान, अजित पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्याप्रमाणेच आम्हीच राष्ट्रवादी आहोत, असा दावा केला आहे. तसेच आपल्याला सर्वात जास्त आमदारांचा पाठींबा असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. जर हे प्रकरण भविष्यात निवडणूक आयोगाकडे गेल्यास शिवसेना पक्षाप्रमाणेच निवडणूक आयोग वरील बाबी तपासू शकतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खरा अधिकार कुणाचा आहे, याचा निकाल देऊ शकतं.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com