‘कलर्स मराठी’वरील ‘सूर नवा ध्यास नवा–आवाज तरूणाईचा’ सध्या ह्या म्युझिकल शोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या स्पर्धेमध्ये, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिमन्यू पात्र साकारणारा अभिनेता समीर परांजपे स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या शोमधील पहिल्या दिवसापासून ते आजवरच्या प्रवासापर्यंत त्याने परिक्षकांसह श्रोत्यांच्या मनावर आपल्या आवजाने सर्वांचेच मने जिंकली. पण जरीही असं असलं तरी, तो ह्या शोमधून एलिमिनेट झालाय. शोमधून एलिमिनेट झाल्यानंतर समीरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहीलीय जी चर्चेत आहे. त्याच्यासोबत शोमधून श्रृती जय ही स्पर्धक देखील स्पर्धेतून बाहेर पडली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
समीर परांजपे आपल्या पोस्टमध्ये लिहीतो,“आयुष्यात एखादी प्रिय गोष्ट काही कारणांनी करायची राहून गेली की ती राहूनच जाते म्हणतात आणि फक्त दिवसेंदिवस आपल्यातलं आणि त्या गोष्टीतलं अंतर वाढत राहतं,आणि आपण असहाय्य पणे फक्त बघत राहतो हळहळत राहतो.. कट्ट्यावर वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे २-४ मित्रांच्या टोळक्यात आपल्या गुरूने दिलेल्या शिदोरीवर पोसलेल्या कलेची चमक दाखवून वाह वाह मिळवत राहतो आणि अरे लेका तू हे seriously करायला हवं होतंस नाव काढलं असतंस हे ऐकून उगाचंच खूष होत राहतो. हे सगळं मी ही अनुभवलं आहे.पण अशीच एखादी राहून गेलेली गोष्ट फिरून परत आली तर? त्या वेळी राहून गेलं होतं काही कारणांनी म्हणतोस ना चल आता संधी आहे आता काय कारण देतोस बोल असे नियातीनेच पत्ते पिसले तर?? मी ही तेच केलं... हावरटा सारखं गाणं जगून घेतलं.”
“सूर नवा ध्यास नवाच्या निमित्ताने पुन्हा गाणं करण्याची संधी मला दिलीत यासाठी सर्वप्रथम कलर्स मराठीचे खूप आभार. कलर्स मराठीच्या सगळ्या टीमने दाखवलेल्या विश्वासामुळे मी गाऊ शकलो. एकविरा प्रॉडक्शन्सची सगळी टीमचे ही खूप आभार फार मजा आली. आमचे mentors @sampadaa_bandodkar @chintamanisohoni तुमचे विशेष आभार. सीन बसवण्याची सवय असलेल्या मला गाणं कसं बसवायचं हे तुम्ही शिकवलंत. आमचे सगळे musicians आणि त्यांचे कॅप्टन @mithileshpatankar दादा तुम्ही वेळोवेळी केलेल्या सूचना आणि तू मस्त गा ऐनवेळी काही झालंच तर “कॅच” पकडायला आहोत. आम्ही ह्या दिलेल्या विश्वासामुळे मी बिनधास्तपणे गाऊ शकलो.”
“@ajitparab75 दादा तुमच्याकडून काव्य/ कविता/ गाणं कसं वाचावं हे शिकायला मिळालं. चाल बसली आहे आता "शब्द गा" ही तुम्ही केलेली सूचना कायम लक्षात राहील आणि कायम मी तो प्रयत्न करेन. @rasika123s तूही सूर नवा चा प्रवास माझ्यासारखाच "जगतीयेस". बोल्ड बिनधास्त ब्युटीफुल आणि उत्तम अभिनेत्री मागची हळवी कलाकार मला कळली आणि खूप भावली. आपली मैत्री इथून सुरू झाली आहे ती अशीच राहील याची खात्री आहे. माझ्या सगळ्या स्पर्धक मित्रांनो तुमच्या कडून ही खूप गोष्टी शिकलो. तुम्ही सगळे कमाल आहात. गाते रहो...”
“सूर नवा चे आमचे लाडके परीक्षक अवधूत गुप्ते काय बोलू मी दादा... नारायणा नंतरची मिठी कायम लक्षात राहील... तुमची शिट्टी आणि पार बुक्का पाडलास मित्रा हे ऐकलं की काय आनंद होतो सांगू..महाराष्ट्राचा रॉकस्टार गायक संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून आमचं मन तूम्ही जिंकल आहेच. परीक्षक म्हणून ही तुम्ही आम्हा सगळ्यांचे लाडके आहात पण इथे शूटींग सुरू होण्याआधी ज्या आत्मियतेने तूम्ही सगळ्या स्पर्धकांची चौकशी करायचात.
तब्येत वैगरे ठीक आहे ना विचारायचात. बाहेरगावाहून आलेल्या आणि स्पर्धेसाठी इकडे मुंबईत राहत असलेल्या स्पर्धकांना राहता तिथे काही अडचण नाही ना, सगळं नीट वेळच्या वेळी मिळतंय ना काहीही अडचण असेल तरी डायरेक्ट मला सांगा म्हणायचात. तेंव्हा मला कळलं कुठल्याही गाण्यातला भाव तुम्ही इतक्या ताकदीने पेश कसं करू शकता.
तुमचं "माणूसपण" तुमच्या प्रत्येक गाण्यात उतरतं बहुदा परीक्षक म्हणून तुम्ही दिलेल्या कॉमेंट्स मधून तर शिकलोच पण माणूस म्हणून ही खूप काही शिकवलंत..खूप प्रेम.. आणि माझा वनवास संपवलात या साठी कायम ऋणात राहीन.”
“महेश काळेच्या गाण्यानंतरच्या तुमच्या सूचना कमेंट्स ह्या लाख मोलाच्या असतातच. त्याचे आम्ही स्पर्धकच नाही तर प्रेक्षक ही फॅन आहेत .पण कला ही साधना आहे आणि साधनेची शुचिर्भूतता कशी राखावी कलेशी एकनिष्ठ कसं राहावं, मेहनतीतून काय साधायचं आणि काय भेदायचं शिकवलंत.. तुम्ही गाता तेंव्हा अभिनेता गातोय असं वाटत नाही गाण्यावर जरूर मेहनत घ्या रियाजाची शिदोरी वाढवा मी तुम्हाला मदत करेन हे तुम्ही म्हणालात हे मला कायम आठवण करून देत राहील की मला गाणं करायचं आहे मेहनत घ्यायची आहे.तुमचे ही खूप आभार”
“आणि सगळ्यात शेवटी रसिकप्रेक्षक, खरंतर मनात खूप भीती होती प्रेक्षक गायक म्हणून स्वीकारतील का? अरे हा अभिनेता आहे ह्याला उगाच आणलंय स्पर्धेत असं तर म्हणणार नाहीत ना.. पण तुम्ही प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम, शुभेच्छा दिल्या.. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद दिलीत आणि गायक म्हणूनही मला स्वीकारलं त्यासाठी तुमचे ही आभार. असच प्रेम आणि आशीर्वाद देत रहा.”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.