आजकाल मराठी सिनेसृष्टीचा डंका जगभरामध्ये वाजत आहे. मराठी चित्रपटांसह मराठी गाण्यांची क्रेझ आपल्याला जगभरात पाहायला मिळत असते. अशातच प्रेक्षकांच्या भेटीला एक सुंदर गाणं आलं आहे. सध्या ह्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. ‘आला बैलगाडा’ असं या गाण्याचं नाव असून गाण्यामध्ये, विशाल फाले, वैष्णवी पाटील, निक शिंदे आणि रितेश कांबळे अशी सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरची स्टारकास्ट आपल्याला गाण्यामध्ये दिसत आहे. ‘आला बैलगाडा’ हे गाणं अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते प्रदर्शित झाले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
‘बीग हिट मीडिया’ या कंपनीने गाण्याची निर्मिती केली आहे. हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट या दोघांनी मिळून ‘बीग हिट मीडिया’ या रेकॉर्ड लेबलची निर्मिती केली आहे. हे गाणं ‘बीग हिट मीडिया’ या युट्यूब अकाऊंटवरुन गाणं शेअर करण्यात आलं आहे. ‘आला बैलगाडा’ हे गाण सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि गायिका सोनाली सोनावणे हिने हे गाणं गायलं आहे. प्रशांत नाकतीने ह्या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. (Song)
अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘आला बैलगाडा’ गाण्याच्या म्युझिक लॉंचिंग कार्यक्रमाला हजेरी लावली होती. म्युझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं. कारण, २०१९ ला जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवत होतो. त्यानंतर जेव्हा जेव्हा संसदेत बोलायला उभं राहिलो. तेव्हा थट्टेनं बाकीचे खासदार उभं राहिलो की बोलायचे बैलगाडा की छत्रपती शिवाजी महाराज!! हे केवळ मनोरंजन नाही, ही ४०० वर्षांची परंपरा आहे. हे सर्व सामान्य शेतकऱ्यांचं मनोरंजन आहे. यामुळे ग्रामीण रोजगाराला चालना मिळते. कारण २ हजार उंबऱ्याच्या गावात जेव्हा ४ ते ५ हजार लोक येतात. तेव्हा अर्थव्यवस्थेला एक चालना मिळते. त्याचबरोबर पर्यटनाला देखील चालना मिळते.”
“आमची स्वप्न मोठी आहेत. जर स्पेनची इकॉनोमी बुलरन आणि स्पॅनिश बुल फाइटवर चालू शकते. तर आपण पण इंटरनॅशनल टुरीझम आपल्या ‘बैलगाडा’साठी करू शकतो. बीग हिट मीडियाचे निर्माते हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट आणि संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. कारण मुलं एखादं स्वप्न पाहतात आणि पालक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतात. ते अस्तित्वात येतं. तुम्ही अश्या विषयाला निवडलं आहे जो विषय फार महत्वाचा आहे. आपल्या भारतामध्ये अनेक परंपरा आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. पण त्याचं कल्चरल नरेटीव्ह करायला आपण कुठे तरी कमी पडंत असतो. पण तुम्ही या गाण्यातून ते योग्यपणे मांडल.” असं म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निर्मात्यांचे कौतुक केले. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.