Ajit Pawar : 'आधी लोकसभेची निवडणूक, नंतर तुमच्या मनातलं होईल', मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांनी पुन्हा दिले संकेत

Ajit Pawar News : 'आधी लोकसभेची निवडणूक, नंतर तुमच्या मनातलं होईल', मुख्यमंत्रीपदाबद्दल अजित पवारांनी पुन्हा दिले संकेत
Ajit Pawar News
Ajit Pawar News Saam Tv
Published On

>> रुपाली बडवे

Ajit Pawar News :

''आधी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल', असं म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. आज रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवार गटाची निर्धार सभा पार पडली. यात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी यांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची लढाई लढली. आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि कोर्टात केस सुरू असल्याने काही निवडणुका थांबल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit Pawar News
Bullet Train Update : बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले जाणून घ्या

ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी मागच्या ९ वर्षात जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शासन आपल्या दारी त्या माध्यमातून लोकांच्या दारात जाऊन त्यांना लाभ देण्याचा काम महायुतीचे सरकार करत आहे.  (Latest Marathi News)

अजित पवार पुढे म्हणाले, ''काही जण विचार करतील ही भूमिका का घेतली? देशपातळीवर काही जण दुसरीकडे जातात, पण आपली विचारधारा सोडत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. सगळ्या समाजाने आपआपल्या भागात गुण्यागोविंदाने राहावं.''

Ajit Pawar News
Ravikant Tupkar Hunger Strike : उभंही राहता येत नव्हतं, दोन जणांची घेतली मदत; तुपकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; काय झाली चर्चा?

मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलन उद्देशून ते म्हणाले, आपली भूमिका मांडताना समाजात तेढ निर्माण होणार नाही, वाद होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरआरक्षण हवं आहे, ओबीसी आरक्षनाला धक्का लागू नये, यासाेटी भूमिका मांडली जात आहे.

अजित पवार म्हणाले, आपली विचारधारा पक्की ठेऊन जर आपल्याला काम करता येत असेल. यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन पूढे जात येत असेल तर, मग सत्तेत सहभागी झालो तर बिघडलं कुठं? शरद पवार यांना टोला लगावत ते म्हणाले की, ''लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करावा लागतो. हे आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगत होतो. पण आमचं ऐकलं नाही. राजकीय भूमिका घ्याव्या लागतात. नितीश कुमार, जय ललित ममता बॅनर्जी यांनीही त्या त्या राजकीय परिस्थिती नुसार भूमिका घेतल्या. सत्तेतून लोकांची कामं करणं ही आमची भूमिका. हातावर हात ठेऊन विरोध करत राहणं, ही आमची भूमिका नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com