Ravikant Tupkar Hunger Strike : उभंही राहता येत नव्हतं, दोन जणांची घेतली मदत; तुपकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; काय झाली चर्चा?

Ravikant Tupkar News : कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न सुटावेत यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं.
Ravikant Tupkar News
Ravikant Tupkar NewsSaam Tv
Published On

Ravikant Tupkar Hunger Strike :

कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न सुटावेत यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. यातच आज त्यांनी मुंबईत सह्यादी अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

अन्नत्याग आंदोलनाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसून आला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना खूप अशक्तपणा जाणवत असल्याचं दिसून आलं. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बिस्कीट घेत उपोषण मागे घेतलं असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ravikant Tupkar News
Nashik News: अद्वय हिरेंपाठोपाठ बंधू अपूर्व हिरेंच्याही अडचणी वाढल्या; नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले आहेत की, ''तेल आणि कापूस आयात करू नका, असं आम्ही राज्य सरकारला सांगितलं आहे. आमच्यासमोर वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना कॉल करण्यात आला. त्यांनी दिल्लीत आम्हाला बैठकीसाठी बोलावले आहे.'' (Latest Marathi News)

'आमच्या 70-80 टक्के मागण्या मान्य'

त्यांनी राज्य सरकाराला आपली मागणी सांगताना म्हटलं आहे की, ''पीक विम्याची रक्कम या महिन्याच्या अखेरपर्यंत जमा झाली पाहिजे. पीक विमा यासाठी शेतकऱ्यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वस्त केले आहे. आमच्या 70-80 टक्क्यांपर्यंत मागण्या मान्य केल्या आहेत. पण आम्ही गप्प बसणार नाही. येत्या 15 दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि सरकारने 15 दिवसांत स्वतःचा शब्द पाळला नाही तर, मात्र आम्ही नागपुरात जाऊन अधिवेशन सुरू असताना विधानसभेला घेराव घालणार.''

Ravikant Tupkar News
Eknath Shinde News: 'घरात बसून काम करणाऱ्यांनी शिकवू नये...' उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेचे प्रत्यूत्तर

तुपकर पुढे म्हणाले की, ''आमचं सरकारला सांगणे आहे की शेतकऱ्यांना मदत करताना हेक्टर आणि एकरची मर्यादा लावू नका. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा.'' ते म्हणाले, ''कृषिमंत्री आजच्या बैठकीत का नव्हते माहीत नाही. पण ते आजारी होते का ? कुठे होते, मला माहित नाही. पण जर कृषिमंत्री दुसऱ्या कुठल्या दौऱ्यासाठी व्यस्त असल्याने शेतीच्या प्रश्नाकडे जर त्यांनी कानाडोळा केला असेल तर, मात्र आम्ही त्यांचा सुद्धा समाचार घेऊ.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com