Eknath Shinde News: 'घरात बसून काम करणाऱ्यांनी शिकवू नये...' उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेचे प्रत्यूत्तर

Eknath Shinde on Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणात प्रचार करत असल्याने उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde NewsSaam tv
Published On

सुरज सावंत, मुंबई| ता. २९ नोव्हेंबर २०२३

Eknath Shinde News:

राज्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या अवकृपेने बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला असून हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणात प्रचार करत असल्याने उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

"आजच्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहे. ३ हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. सर्व पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना केल्यात.." असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) निशाणा साधला. "महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. आम्ही जन हिताचे निर्णय घेतो. काहींचा घरात बसून एक कलमी कार्यक्रम सुरू आहे नुसती टिका करणं, फेसबुकवरून लाईव्ह येत होते त्यांच्याबाबत पवार साहेबांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे..." अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

CM Eknath Shinde News
Revas Reddy Coastal Highway : रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला लवकरच गती येणार

"आम्ही जनतेत जाऊन काम करतो. अपशब्द बोलणे, उठ- सूठ टिका करणं ही बाळासाहेबांची संस्कृती नाही. तै वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ.." असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM EKnath Shinde) लगावला. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CM Eknath Shinde News
Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान विधानसभाध्यक्षांची दमछाक, राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाकडे अधिकचा वेळ मागणार : सूत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com