बॉलिवूड अभिनेते सनी देओल गेल्या काही दिवसांपूर्वी ‘गदर २’ मुळे प्रचंड चर्चेत आले होते. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारे सनी देओल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
पंजाबमधील पठाणकोटमध्ये सनी देओल हरवले असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तर त्यांना शोधुन देणाऱ्याला ५० हजार रुपये इतकं बक्षीस मिळणार आहे. हे असे पोस्टर्स लावणं ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील पंजाबमधील पठाणकोटमध्ये सनी देओल हरवला असल्याचे पोस्टर लावण्यात आले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सनी देओल बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध अभिनेते असून लोकसभेचे खासदार सुद्धा आहे. गुरुदासपूर-पठाणकोट लोकसभा मतदारसंघाचे सनी देओल भाजप खासदार आहेत. सनी देओल जेव्हापासून खासदार झाले आहेत, तेव्हापासून ते एकदाही मतदारसंघात दिसले नाहीत.
त्यामुळे मतदारसंघातील लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. त्यासोबतच विकासकामेही झाले नसल्याचे तेथील नागरिकांचं म्हणणे आहे. पठाणकोट जिल्ह्यातील हलका भोआतील नागरिकांनी सरना बसस्थानकावर रविवारी (१० डिसेंबर) सनी देओल हरवले असल्याचे पोस्टर्स लावले आहेत. हरवले असल्याचे पोस्टर्स लावत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी पठाणकोट जिल्ह्यामध्ये आणि सुजानपूरमध्ये सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावले होते. (Social Media)
सनी देओल पंजाबमधील पठाणकोट लोकसभा मतदारसंघाचा खासदार असून निवडणूक झाल्यानंतर एकदाही मतदारसंघात तो गेलेला नाही. तिथे त्याने काहीच विकास केला नाही, असा तेथील लोकांचा आरोप आहे. यामुळे त्यांनी अशाप्रकारे विरोध प्रदर्शन केले आहे. तसेच २०२४ च्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाने अशा लोकांना तिकीटच देऊ नये असं म्हटलं आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.