Actress Ashwini Kasar Buy New Home Instagram
मनोरंजन बातम्या

Ashwini Kasar Buy New Home: स्वप्नपूर्ती! मराठमोळ्या अभिनेत्रीनं खरेदी केलं आलिशान घर, वाढदिवशीच दिलं स्वत:ला हटके गिफ्ट

Television Actress Ashwini Kasar News: भारत गणेशपुरे, पृथ्वीराज प्रताप आणि अक्षय केळकरनंतर एका मराठमोळ्या अभिनेत्रीलाही म्हाडाच्या घराची लॉटरी लागली आहे.

Chetan Bodke

Actress Ashwini Kasar Buy New Home

प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. स्वप्नातलं घर साकारण्यासाठी फक्त सर्वसामान्य व्यक्तीच नाही तर सेलिब्रिटीही प्रयत्न करत असतात. २०२३ या वर्षी अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींनी नवं घर खरेदी केले आहेत. त्यातच अनेकांना म्हाडाच्या घराचीही लॉटरी लागली आहे.

भारत गणेशपुरे, पृथ्वीराज प्रताप आणि अक्षय केळकरनंतर एका मराठमोळ्या अभिनेत्रीलाही म्हाडाच्या घराची लॉटरी लागली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धीझोतात आलेली आश्विनी कासार हिने तिच्या स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. अश्विनीने एका व्हिडीओच्या माध्यमातून घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आश्विनी कासार पोस्टमध्ये म्हणते, ‘आपण काम करत असलेल्या क्षेत्रामुळे आणि काम करतोय त्या शहरात हक्काचं स्वतःचं घर होणं... हे एकतर स्वप्न आहे किंवा कधी काळी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय...!! खूप संमिश्र भावना आहेत. माझ्या वाढदिवशी आनंद द्विगुणीत करणारी गोष्ट तुम्हा सगळ्यांनाही सांगण्यासाठी हा शब्दप्रपंच. काही वर्षांपूर्वी बदलापूरपासून सुरु झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी माझ्या राहत्या घरापर्यंत मी पोहोचू शकायचे नाही. पण माझ्या मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या (आणि आता माझ्याही) कुटुंबियांनी, नातेवाईकांनी मला घराची उणीव कधी जाणवू दिली नाही.’ (Serial)

‘नुसतं घरच नाही तर ‘घरपण’ सुद्धा दिलं. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे. तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि ‘आपलं घर ते आपलं घर’ या भावनेपोटी मी बदलापूर गाठायचे. रात्री बेरात्री केलेला प्रवास, तब्येतीच्या तक्रारी, मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम, कामाप्रती श्रद्धा, जिद्द, आसू आणि हसू हे सगळं सगळं आठवतंय. सगळं ‘Worth’ वाटतंय. आता कंबर कसून जास्त छान काम करू ही ताकद या घराने दिली आहे.’ (Social Media)

‘मुंबई’ ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं असं काहीसं वाटतंय..!! माझ्या घर मिळण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली आहे. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. म्हाडा आणि महाराष्ट्र शासनाचे आभार..!! तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी आणि माझं घर कायम असू..!! भावना समजून घ्याल याची खात्री आहे..!!’ असं अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. तिच्या ह्या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT