Gauri Khan: 'किंग खान'ची पत्नी गौरी खान अडचणीत, ईडी समन्स पाठवण्याच्या तयारीत; नेमकं प्रकरण काय?

Tulsiani Group Case: तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये गौरी खानचे नाव येण्यामागचे कारण म्हणजे या ग्रुपने गौरी खानला कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनवली होती. तुलसियानी ग्रुपवर फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात गौरी खानच्या नावाचा समावेश आहे.
Shah Rukh Khan And Gauri Khan
Shah Rukh Khan And Gauri KhanSaam Tv
Published On

Tulsiani Group Brand Ambassador Gauri Khan:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खान (Gauri Khan) अडचणीमध्ये आली आहे. गुंतवणूकदार आणि बँकांना 30 कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये गौरी खानचे देखील नाव आले आहे. या घोटाळा प्रकरणात गौरी खानविरोधात देखील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे ईडी गौरी खानला समन्स पाठवण्याच्या तयारीमध्ये आहे.

तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये गौरी खानचे नाव येण्यामागचे कारण म्हणजे या ग्रुपने गौरी खानला कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनवली होती. तुलसियानी ग्रुपवर फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात गौरी खानलाही आरोपी करण्यात आले होते. सध्या देशामध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे. आता गौरी खानचे नाव आल्यामुळे याप्रकरणी ईडी तिची देखील चौकशी करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

ईडीकडून सध्या तुलसियानी ग्रुपच्या या घोटाळा प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खानला नोटीस बजावण्यासाठी ईडी मुख्यालयाकडून परवानगी घेण्याची तयारी सुरू आहे. गौरी खानला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी तुलसियानी ग्रुपने किती पैसे दिले होते? आणि त्यासाठी काही करार झाला होता का? या सर्व गोष्टींचा शोध ईडीचे अधिकारी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Shah Rukh Khan And Gauri Khan
Ankita Lokhande Birthday: अंकिताला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं, खरं नावही तुम्हाला माहित नसेल...

तुलसियानी ग्रुप घोटाळा प्रकरणी मुंबईचे रहिवासी असलेले किरीट जसवंत शहा यांनी फेब्रुवारी महिन्यात तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्याविरुद्ध राजधानी दिल्लीतील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

किरीट शहा यांनी तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, गौरी खानने या कंपनीचे प्रमोशन केल्यामुळे त्यांनी 2015 साली तुलसियानी ग्रुपकडून 85 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. नंतर कंपनीने त्यांना ताबा दिला नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाहीत.

Shah Rukh Khan And Gauri Khan
Dunki Drop 6 Banda: किंग खानच्या 'डंकी'मधील 'बंदा' गाणं रिलीज, दिलजीत दोसांझच्या आवाजातील गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com