Govinda Online Crypto- Ponzi Scheme: 1000 कोटींच्या घोटाळा प्रकरणी अभिनेता गोविंदाची होणार चौकशी, नेमकं काय आहे प्रकरण?

Govinda News: आर्थिक गुन्हे शाखा (EOW) लवकरच १००० कोटी रुपयांच्या ऑनलाइन क्रिप्टो- पॉन्झी घोटाळ्याची चौकशी करणार आहे.
Govinda Online Crypto- Ponzi Scheme
Govinda Online Crypto- Ponzi SchemeInstagram
Published On

Govinda Online Crypto- Ponzi Scheme

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा कायमच आपल्या उत्तम अभिनयामुळे तो चर्चेत असतो. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि त्याच्या उत्तम विनोदामुळे चर्तेत राहिलेला अभिनेता सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा लवकरच १००० कोटी रुपयांच्या ऑनलाइन पॉन्झी घोटाळ्याची चौकशी करणार आहे.

सोलर टेक्नो अलायन्स (STA-Token) ने अनेक देशांमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली बेकायदेशीर ऑनलाइन पॉन्झी योजना चालवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कंपनीला गोविंदाने प्रोत्साहन आणि पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.

Govinda Online Crypto- Ponzi Scheme
Akshaya Naik New Theater: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर एन्ट्री, नवीन नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

घोटाळ्यामध्ये अनेक लोकांची फसवणूक झाली असून कंपनीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून कोणत्याही अधिकृततेशिवाय ठेवी घेतलेल्या आहेत. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण भारतातील २ लाखांहून अधिक लोकांची १००० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. दरम्यान, याप्रकरणामध्ये अभिनेत्याची चौकशी करण्यात येणार आहे.

EOW इंस्पेक्टर जनरल जेएन पंकज यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'बॉलिवूड अभिनेता गोविंदाची चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरच एक टीम मुंबईला पाठवणार आहोत. गोविंदाने जुलै महिन्यात गोव्यामध्ये एसटीएच्या भव्य कार्यक्रमात सहभागी झाला होता आणि त्यावेळी त्याने काही व्हिडीओंमध्ये कंपनीची जाहीरात केली होती.

Govinda Online Crypto- Ponzi Scheme
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: OTT वर रिलीज झाला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट, कधी आणि कुठं पाहता येणार?

EOW इंस्पेक्टर जनरल जेएन पंकज आपल्या मुलाखतीत पुढे सांगतात, 'सध्या अभिनेता हा संशयित किंवा आरोपी नाही. तपासानंतरच या प्रकरणातील त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट होईल. जर आम्हाला कळले की त्यांची भूमिका त्यांच्या व्यावसायिल करारानुसार केवळ (STA-Token) ब्रँडचा प्रचार करण्याकरिता मर्यादित होती, तर आम्ही अभिनेत्याला आमच्या खटल्यात साक्षीदार बनवू.' अशी माहिती दिली. देशातील वेगवेगळ्या महत्वाच्या शहरामधील अनेक लोकांकडून या कंपनीने कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला कोणतं वळण येणार हे पहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Govinda Online Crypto- Ponzi Scheme
Aamir Khan And Reena Dutta Video: आमिर खान आणि रिना दत्ता पुन्हा एकत्र?, VIDEO समोर येताच चर्चांना वेग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com