Actor Vishal Accused Mumbai Censor Board Office Of Corruption Instagram
मनोरंजन बातम्या

Actor Vishal Video: तमिळ अभिनेत्याचा CBFCने लाच मागितल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे आणि पंतप्रधानांकडे केली तक्रार

Tamil Actor Vishal Video: तमिळ अभिनेता विशालने एका व्हिडीओच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचारावर भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Actor Vishal Accused Mumbai Censor Board Office Of Corruption

तमिळ अभिनेता विशालने २८ सप्टेंबर रोजी (गुरुवार) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने चित्रपटसृष्टीमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचारावर भाष्य केले आहे. अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर करताच, अवघ्या काही वेळात चर्चेत आला आहे. येत्या काही दिवसात त्याचा ‘मार्क अँटनी’नावाचा एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटासाठी त्याच्याकडून सीबीएफसीने 6.5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे.

अभिनेत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये अभिनेता विशालने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चित्रपटसृष्टीमध्ये सुरु असलेल्या घटनेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “रुपेरी पडद्यावर दाखवला जाणारा भ्रष्टाचार ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात होणारा भ्रष्टाचार पचवता येत नाही. विशेषतः सरकारी कार्यालयामध्ये होणारा भ्रष्टाचार. आणि वाईट गोष्ट म्हणजे, CBFCच्या मुंबई कार्यालयात भ्रष्टाचार होत आहे.”

अभिनेता विशाल आपल्या पोस्टमध्ये पुढे बोलतो, “माझ्या मार्क अँटॉनी या हिंदी भाषेतल्या चित्रपटासाठी माझ्याकडे 6.5 लाख मोजावे लागले. स्क्रीनिंगसाठी 3 लाख आणि चित्रपटाच्या सर्टिफिकेटसाठी 3.5 लाख. मी माझ्या फिल्मी कारकिर्दित कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नाही. चित्रपट रिलीज झाल्यापासून संबंधित मध्यस्थला खूप जास्त पैसे देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.”

“मुंबईच्या CBFC कार्यालयात होणारा भ्रष्टाचार मी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि माझे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या निदर्शनास आणून देत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणत्याही निर्मात्याच्या आयुष्यात अशी घटना घडणार नाही. माझ्या कष्टाचे पैसे गेले भ्रष्टाचारासाठी??? माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. मला विश्वास आहे, नेहमीच सत्याचाच विजय होतो.”

पोस्टच्या शेवटच्या भागात अभिनेत्याने चाहत्यांसोबत ज्या दोन व्यक्तींना त्याने पैसे पाठवले, त्यांचे बँक डिटेल्सही शेअर केले आहेत. संबंधितांवर काय कारवाई होणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रविचंद्रन यांनी ‘मार्क अँटनी’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट १५ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त १५ दिवसांत ५० कोटींचा टप्पा गाठला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT