Siddharth: सुपरस्टार सिद्धार्थला पत्रकार परिषदेतून काढावा लागला काढता पाय; नेमकं प्रकरण काय?

Siddharth News: बंगळुरुमध्ये ‘चिठ्ठा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सिद्धार्थ सध्या व्यस्त आहे. त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये काही आंदोलकांनी गोंधळ घातलाय.
Actor Siddharth Press Conference News
Actor Siddharth Press Conference NewsTwitter
Published On

Actor Siddharth Press Conference News

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘चिठ्ठा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सिद्धार्थ व्यग्र आहे. अभिनेता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बंगळुरुला गेला होता. यावेळी त्याने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पण या पत्रकार परिषदेमध्ये काही आंदोलकांनी गोंधळ घातला होता. आंदोलकांचा हा गोंधळ घालणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Actor Siddharth Press Conference News
Sir Michael Gambon Died: ‘हॅरी पॉटर’मधील ‘मिस्टर डंबलडोअर’ काळाच्या पडद्याआड, गंभीर आजाराने झाले निधन

कन्नड समर्थक संघटनेच्या काही सदस्यांनी सिद्धार्थच्या चित्रपटासंबंधित सुरु असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये येऊन गोंधळ घातला. दरम्यान गोंधळ घातल्यामुळे अभिनेत्याला पत्रकार परिषदेतून काढता पाय घ्यावा लागला. अभिनेत्याने बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला आंदोलक बोलताना अडथळा आणत होते. त्यामुळे त्याला उठून पत्रकार परिषद सोडून जाण्यास भाग पडले. सिद्धार्थ नुकताच ‘चिठ्ठा’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बंगळुरुमध्ये होता. या चित्रपटाला कन्नडमध्ये ‘चिक्कू’ असे म्हणतात.

चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्स सुरु करण्यापूर्वी, कन्नड समर्थक संघटनेतले काही सदस्य आत आले आणि त्यांनी आयोजकांना पत्रकार परिषद थांबवण्यासाठीची माहिती दिली. सिद्धार्थने माध्यमांसोबत संवाद साधण्यासाठी सुरुवात केल्यानंतर, आंदोलकांनी त्याला पुन्हा व्यत्यय आणला. यावेळी आंदोलकांनी अभिनेत्याला कावेरी चळवळीला पाठिंबा दर्शवण्यास सांगितले. पुढे आंदोलकांनी आंदोलन कायम ठेवत, त्याच्या मागे असलेला पोस्टरही काढला. आंदोलन शांत होण्याचे नाव काही घेत नव्हते, तेव्हा सिद्धार्थ उभा राहिला आणि हात जोडून उपस्थितांचे आभार मानत तिकडून निघून गेला. (Tollywood)

Actor Siddharth Press Conference News
Avinash Narkar Video: 'हुबेहूब साईराज केंद्रेच दिसताय', अविनाश नारकर यांच्या नवीन VIDEO वर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

कर्नाटकामध्ये, नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या विरोधात गुरुवारी काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. हे आंदोलन गेल्या १५ दिवसांपासून सुरु आहे. खरंतर, कर्नाटक आणि तामिळनाडूतील पाण्याचा वाद १० वर्ष जुना आहे. या वादामुळे सध्या बंगळुरुमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे. २९ सप्टेंबर म्हणजे आज कर्नाटक बंदचीही घोषणा करण्यात आली आहे.

चित्रपटाविषयी सांगायचे तर, ‘चिठ्ठा’ हा चित्रपट कन्नड भाषेतील असून चित्रपटाचे दिग्दर्शन एस.यू.अरूण कुमार करीत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सिद्धार्थ, निमिषा सजयन, अंजली नायर आणि सहस्त्र श्री हे कलाकार आहेत. चित्रपट येत्या २८ सप्टेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Entertainment News)

Actor Siddharth Press Conference News
Raj Kumar Rao New Movie: राजकुमार राव लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ'मध्ये करणार धम्माल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com