Raj Kumar Rao New Movie
Raj Kumar Rao New MovieSaam Tv

Raj Kumar Rao New Movie: राजकुमार राव लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ'मध्ये करणार धम्माल

Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie Announcement: 'ड्रीम गर्ल' आणि 'ड्रीम गर्ल 2' चे दिग्दर्शन करणारे राज शांडिल्य हेच राजकुमारच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
Published on

Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार रावला (Rajkumar Rao) आज कोणी ओळखत नाही असे नाही. राजकुमारने आपलया दमदार अभिनय आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. राजकुमार रावच्या नवनवीन चित्रपटांसाठी त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशामध्ये त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राजकुमार राव लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'विक्की विद्या का वो वाला वीडियो' (Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Raj Kumar Rao New Movie
Sshort And Ssweet Teaser: ‘शॉर्ट अँड स्वीट’चा स्वीट टीझर लाँच, कुटुंबातील गोड नात्यावर चित्रपट भाष्य करणार

अभिनेता राजकुमार राव येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये दिसणार असून आता त्याच्या खात्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. लवकरच राजकुमार 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ड्रीम गर्ल' आणि 'ड्रीम गर्ल 2' चे दिग्दर्शन करणारे राज शांडिल्य हेच राजकुमारच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Raj Kumar Rao New Movie
Katrina Kaif WhatsApp Channel: व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर कतरिना कैफची बाजी, फॉलोअर्सच्या बाबतीत मार्क झुकरबर्गलाही टाकलं मागं

टी-सीरीजने सोशल मीडियावर चित्रपटाचे एक जबरदस्त पोस्टर शेअर केले आहे. हे नवं कोरं पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'भूतकाळातील एक धमाका. 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या कौटुंबिक नाटकाद्वारे राजकुमार आणि तृप्ती ९० च्या दशकातील आठवणी ताज्या करण्यासाठी येत आहेत.' दुसरीकडे राज शांडिल्य यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'ड्रीम गर्ल 2' नंतरचा हा त्याचा पुढचा चित्रपट असल्याची माहिती दिली.

'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटाची कथाही राज शांडिल्य यांनीच लिहिली आहे. राज शांडिल्य यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, ते एक प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि चित्रपट लेखक आहेत. त्यांनी २००६ मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. शांडिल्य यांनी कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि सुदेश लाहिरी यांच्यासाठी जवळपास ३५० स्क्रिप्ट्स आणि कपिल शर्मासाठी जवळपास २०० स्क्रिप्ट्स लिहिल्या आहेत.

Raj Kumar Rao New Movie
Chandramukhi 2 Online Leak: कंगना रनौतला मोठा झटका, HD मध्ये लीक झाला 'चंद्रमुखी 2'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com