दिवसेंदिवस अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. मालिका, नाटक आणि चित्रपटातून त्यांनी आपल्या लाडक्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. सध्या अविनाश नारकर सोशल मीडियावर रिल लाईफमुळे नाहीतर रियल लाईफमुळे चर्चेत आले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अविनाश आणि पत्नी ऐश्वर्या नारकर यांच्या अनेक रील इन्स्टाग्रामवर चर्चेत होत्या. त्यांच्या रीलवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद ही दिला होता. अशातच सध्या सोशल मीडियावर अविनाश नारकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अविनाश नारकर सध्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी गेले आहेत. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धुम असून त्यांनीही आपल्या गावी भुईबावडा येथे गणेशोत्सव साजरा केला. नुकतंच अविनाश यांनी चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत, अविनाश आपल्या गावच्या हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मागच्या बाजुला निखळ वाहणारी नदी, हिरवेगार झाडं दिसून येत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.(Marathi Film)
त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “यंदा गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी गावी गेलो होतो...!! व्वा व्वा व्वा...!! निसर्गाच्या सहवासात मन आणि शरीर बघा कसं ताजंतवानं आणि टवटवीत होतं ते.......!! निसर्गाचा सहवास आणि बाप्पाचा ध्यास करी साऱ्या दु:खांचा ह्रास....!! गणपती बाप्पा मोरया...!!”
`व्हिडीओमध्ये ते म्हणतात, “माझं गाव आहे हे भुईबावडा, वरती भुईबावडा आणि खाली घाट उतरला की, गगनबावडा... हे बघा निसर्गाचे सौंदर्य, गावच्या हिरव्यागार स्वर्गात एकदा यायलाच पाहिजे, गावी गणपतीमध्ये यायलाच पाहिजे.” (Actor)
पुढे व्हिडीओमध्ये, त्यांनी आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर डान्स केला. अगदी साईराजप्रमाणेच त्यांनी हावभाव देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या अविनाश नारकर यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. त्यांच्यावर अनेक नेटकऱ्यांनी हे गाव आमचंही आहे, असे म्हणाले आहे तर, काहींना नारकर यांच्या गावचं निसर्ग आवडल्याचं सांगितलं आहे. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.