Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाच्या कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीत मराठी सेलिब्रिटींच्या कलावंत पथकाचं वादन

Pune News: पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कलावंत ढोलपथकाने वादन केलंय.
Kasba Ganpati Visarjan Miravnuk Kalawant Dhol Pathak
Kasba Ganpati Visarjan Miravnuk Kalawant Dhol PathakSaam Tv

Kasba Ganpati Visarjan Miravnuk Kalawant Dhol Pathak

राज्यातल्या अनेक मुख्य शहरांमध्ये आज लाडक्या गणरायाला (Ganeshotav 2023) निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांमध्ये लाडक्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची चांगलीच धुम पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य रांगोळी, ढोल- ताशा पथक, लाडक्या भक्तांची गर्दी, फुलांचा सडा यामुळे विसर्जनाची शोभा आणखी वाढली. सध्या पुण्यामध्ये मराठी सेलिब्रिटींमध्ये कमालीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नुकतंच सकाळ टीमने काही मराठी कलाकारांसोबत संवाद साधला आहे.

Kasba Ganpati Visarjan Miravnuk Kalawant Dhol Pathak
Katrina Kaif WhatsApp Channel: व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर कतरिना कैफची बाजी, फॉलोअर्सच्या बाबतीत मार्क झुकरबर्गलाही टाकलं मागं

पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मराठी सेलिब्रिटीही पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कलावंत ढोलपथकाने वादन केलंय. विसर्जनाचे औचित्य सकाळ डिजीटल टीमने कलावंत ढोलपथकातील सदस्य आणि लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत खास बातचीत केलीय.

यावेळी तो मुलाखतीत म्हणाला, “मी पुण्यातल्या ‘कलावंत’ या ढोल पथकामध्ये गेल्या १० वर्षांपासून वादन करतोय. वादन करताना खुप चांगलं वाटतं. इथे आल्यावर अंगात एक वेगळी एनर्जी संचारते. वादन केल्यानंतर आमच्या अंगात डबल उत्साह मिळतो. गणेशोत्सव संपूर्ण राज्यात साजरा होतोय, गणपती बाप्पा मोरया...”

यावेळी पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री श्रृती मराठे, तेजस्विनी पंडीत, अनुजा साठे, आस्ताद काळे, शाश्वती पिंपळीकर, दिप्ती देवी सह इत्यादी कलाकार सहभागी होते. अनेक मराठी सेलिब्रिटी एकत्र येत पुण्यात २०१४ मध्ये ढोलताशा पथक सुरु केले. यावेळी या ढोलताशा पथकाची सुरुवात अभिनेता सौरभ गोखलेने पुढाकार घेऊन ‘कलावंत’ पथकाची सुरुवात केली अशी माहिती आहे. यंदाचे हे या कलाकारांचे दहावे वर्ष आहे.

Kasba Ganpati Visarjan Miravnuk Kalawant Dhol Pathak
TRP Rating Of Marathi Serial: ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती, TRP मध्ये नंबर १ वर; तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’लाही टाकलं मागे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com