TMKOC  SAAM TV
मनोरंजन बातम्या

TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या चाहत्यांना मोठा धक्का, 'जेठालाल'चा पत्ता कट?

Dilip Joshi Leave TMKOC? : सोशल मीडियावर सध्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोची चर्चा रंगली आहे. 'जेठालाल' हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोले जात आहे. नेमकं सत्य काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या चाहत्यांसाठी मोठी माहिती

'जेठालाल' हे पात्र शोमधून निरोप घेणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा

गेली १८ वर्ष 'जेठालाल' हे पात्र प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहे.

प्रेक्षकांचा आवडता शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये मोठा बदल होणार आहे. गेल्या १८ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या मालिकेचे चाहते आहेत. रोज या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. खूप वर्षांपासून चाहते दयाबेनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

गेल्याकाही वर्षात अनेक कलाकारांनी मालिका सोडली तर अनेक नवीन कलाकारांची एन्ट्री झाली. मालिकेच्या मुख्य कलाकारांपैकी एक प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी सुरुवातीपासून या शोचा महत्त्वाचा भाग आहे. या मालिकेत ते जेठालालची भूमिका साकरत आहे. हे पात्र प्रेक्षकांना आता आपल्या घरातील वाटते. हे पात्र प्रेक्षकांना खळखळवून हसवते. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की, दिलीप जोशींची 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधून एक्झिट होणार आहे. जेठालाल हे पात्र शोमधून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

aajtak शी बोलताना 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोच्या निर्मात्यांनी सांगितले की, "जेठालालचे पात्र शो मधून निरोप घेणार नाही. दिलीप जोशींची मालिकेतून एक्झिट होणार नाही. कथा अजूनही जेठालालभोवतीच केंद्रित आहे. शोचा नवीन प्रोमो देखील प्रदर्शित झाला आहे. २८ जुलै रोजी आम्ही शोचा १८ वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत..." जेठालालचे पात्र संपणार नाही. याचा अर्थ जेठालालच्या पात्राबद्दलच्या सर्व अफवा खोट्या आहेत.

TMKOC चा नवीन प्रोमो

नुकताच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो चा नवीन प्रोमो समोर आला आहे. यात जेठालाल आणि तारक मेहता धावपळ करताना दिसत आहे. जेठालाल दुकान उघडण्यासाठी जातो, तेव्हा त्याला दुकानावर टाळे दिसते. त्यानंतर फाईन भरण्यासाठी जेठालाल कसरत करताना दिसतो. एकंदर येणारे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' चे एपिसोड खूपच मनोरंजक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT