Ranbir Kapoor : रणबीर कपूरने पुण्यात खरेदी केली कोट्यवधींची जमीन, किंमत वाचून बसेल धक्का

Ranbir Kapoor Buys Land In Pune : रणबीर कपूरने पुण्यात कोट्यवधींची जमीन खरेदी केली आहे. किती कोटींची डील झाली, जाणून घेऊयात.
Ranbir Kapoor Buys Land In Pune
Ranbir Kapoor saam tv
Published On
Summary

रणबीर कपूरची मोठी गुंतवणूक

रणबीर कपूरने पुण्यात खरेदी केली प्रॉपर्टी

रणबीर कपूर लवकरच 'रामायण' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर गेल्याकाही काळापासून आपला आगामी चित्रपट 'रामायण' मुळे चांगलाच चर्चेत आहे. २०२६ च्या दिवाळीत 'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्री रामांच्या रुपात दिसणार आहे. अशात आता रणबीर कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अयोध्येत मालमत्ता खरेदी केल्यानंतर रणबीर कपूरने आता पुण्यात नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

TOI च्या वृत्तानुसार, रणबीर कपूरने पुण्यात मुळशी तालुक्यात १६.४२ कोटी रुपयांना सुमारे २५ एकर जमीन खरेदी केली आहे. 'सीआरई मॅट्रिक्स'ने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, ३० एप्रिल २०२६ रोजी नोंदणीकृत झालेल्या या व्यवहारामध्ये पिंपरी गावातील लगतच्या चार भूखंडांचा समावेश आहे. यातील सर्वात मोठा भूखंड (क्षेत्रफळ ४३,८०० चौरस मीटर) ७.०७ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला. २९,९०० चौरस मीटरचा दुसरा भूखंड ४.६२ कोटी रुपयांना, तर २१,४०० चौरस मीटरचा भूखंड ३.३१ कोटी रुपयांना खरेदी केला गेला. चौथा आणि सर्वात लहान भूखंड (८,९०० चौरस मीटर) १.३९ कोटी रुपयांना घेण्यात आला.

एकूणच, या चार भूखंडांचे क्षेत्रफळ १,०४,००० चौरस मीटर किंवा अंदाजे २५.७ एकर इतके असून या व्यवहाराचे एकूण मूल्य १६.४२ कोटी रुपये आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांवरून असे दिसून येते की, या खरेदीसाठी ८२.१३ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे.

'रामायण' चित्रपटासंबंधित

'रामायण' हा चित्रपट नितेश तिवारी दिग्दर्शित आहे. २०१७ मध्ये या 'रामायण'ची घोषणा करण्यात आली होती. 'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग यावर्षी २०२६ च्या दिवाळीला तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायणात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. माता सीतेच्या भूमिकेत साऊथ अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे. तर रावणाची भूमिका साऊथ हिरो यश साकारणार आहे.

Ranbir Kapoor Buys Land In Pune
Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com