TMKOC: 'तिच्या सासरचे नाही...'; 'तारक मेहता'मध्ये कधीच परत येणार नाही दया बेन, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

TMKOC: जेनिफर मिस्त्रीने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाबेनच्या परत येण्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. तिने स्पष्ट केले की, दिशा वकानी या मालिकेत परतणार नाही.
TMKOC
TMKOCSaam Tv
Published On

TMKOC: लोकप्रिय टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा वारंवार चर्चेत असते. कधी तिच्या विनोदांमुळे, कधी वादांमुळे, तर कधी एका मोठ्या आणि दीर्घकाळापासून प्रेक्षकांच्या मनात असलेल्या प्रश्नामुळे. हा प्रश्न म्हणजे 'दयाबेन' परत कधी येणार? या मालिकेत 'मिसेस रोशन सोढी' ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री यांनी मालिका सोडली. त्यानंतर मालिकेबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. जेनिफरने सांगितले की, दिशा वकानी खरोखरच मालिकेत पुन्हा येण्याचा विचार करत होती; परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अडचणींमुळे तिला पुन्हा येणे शक्य झाले नाही.

बॉलिवूड बबलशी बोलताना जेनिफर म्हणाली, 'ही मालिका सुरू आहे आणि ती यापुढेही सुरूच राहील. तारक मेहता मालिकेचे नशीब कोणीही बदलू शकत नाही. मग ती दयाबेन असो, मालिकेचे जुने दिग्दर्शक, सोढी, हाथी; किंवा मी स्वतः, टप्पू अथवा सोनू असो कोणीही मालिका सोडून गेल्याने काहीच फरक पडलेला नाही. अगदी दयाबेन मालिका सोडून गेल्यानेही काहीच फरक पडला नाही. दयाबेन २०१७ पासून मालिकेत नाहीये. आता तर जवळपास १० वर्षे उलटून गेली आहेत. तरीही ही मालिका आजही नियमितपणे प्रसारित होत आहे."

TMKOC
Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

जेनिफर पुढे म्हणाली, काही ठराविक कालावधीनंतर, दयाबेन पुन्हा येणार आहे किंवा ती लवकरच परतणार आहे, अशा स्वरूपाच्या अफवा अधूनमधून पसरत असतात. अनेकदा तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात. परंतु नंतर असे स्पष्ट होते की, त्या केवळ अफवाच होत्या. ही मार्केटिंग स्ट्रॅटजी आहे. मधल्या वेळात दया बेनच्या पात्रासाठी एका मुलीची निवड करण्यात आली होती. ती ऑडिशनसाठी दिल्लीहून यायची तिला २ वर्ष बूक करुन ठेवलं होतं.

TMKOC
Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; अल्झायमरशी झुंज देताना घेतला अखेरचा श्वास

जेनिफर पुढे म्हणाली, "ती १०० टक्के 'दयाबेन' या पात्रासाठी परफेक्ट होती. मात्र, ती वयाने खूपच लहान होती कदाचित फक्त २६ किंवा २७ वर्षांची असेल. दिलीप जोशी यांच्यासोबत ती खूपच लहान दिसेल आणि त्यामुळे ते फारसे शोभून दिसणार नाही, असे वाटले. याच कारणामुळे तिला मालिकेत घेतले नाही.

दिशा वकानी कधीही परत येणार नाही

जेनिफरने पुढे स्पष्ट केले की, " काहीही झाले तरी, दिशा वकानी मात्र मालिकेत परत येणार नाही. २०२० किंवा २०२१ मध्ये दिशा म्हणत होती की "हो, आता मी पुन्हा काम करणार आहे." मात्र, त्यानंतर नक्की काय घडले, हे मला ठाऊक नाही. ती सेटवर आलीही होती, तिने कॉस्ट्यूम्स वगैरे घालून पाहिले आणि नंतर ती निघून गेली. पण त्यानंतर नक्की काय घडले, हे मला खरोखरच माहीत नाही. आम्हाला जी माहिती मिळाली, ती अशी की तिच्या कुटुंबाचे काही नियम होते. त्यांची अट अशी होती की, ती रात्रीच्या वेळी शूट नाही करायचं, रविवारी काम नाही करायचं आणि कामाचे तास पण कमी असायला पाहिजे. जास्त वेळ शूट नाही करायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com