Taarak Mehta Ka Ooltah Chashmah canva
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, ७ वर्षांचा सुखी संसार मोडणार

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress Divorce: तारक मेहता का उलटा चश्मामधील नविना बोलेचा घटस्फोट होणार आहे. नविनाने लग्नाच्या सात वर्षानंतर मोठा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनी सबवरील (Sony Sab)लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतील एका अभिनेत्रीचा घटस्फोट होणार आहे. तारक मेहता का उलटा चष्मामधील 'बावरी' ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री नविना बोलेचा घटस्फोट (Divorce)होणार आहे. नविना सात वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकली होती.

नविना बोलेने तारक मेहताच्या (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आधी 'इश्कबाज' या मालिकेत काम केलं होतं. 'इश्कबाज' मध्ये अभिनेत्रीने 'टिया' ही व्यक्तीरेखा साकारली होती. तिच्या अभिनयामुळे नविना अनेकांच्या घरा घरात पोहोचली. तारक मेहतामधील बावरी या व्याक्तीरेखेमुळे नविनाला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. त्यापूर्वी नविना 'मिले जब हम तुम' आणि 'जीनी और जुजू' यांच्या सारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली होती.

गेल्या काही दिवसांपासून नविनाच्या वैवाहिक आयुष्यामध्ये (Married Life) अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या लग्नाला वर्षे पूर्ण झाली आहेत. पपरंतु काही कारणांमुळे नविना आणि तिच्या नवऱ्यामध्ये दुरावा वाढल्याच्या बातम्या समोर येत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, नविना तिचा पती अभिनेता-निर्माता जीत करणपासून वेगळी झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखाती दरम्यान नविनाने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता. २०१७ मध्ये नविना आणि जीत करण लग्नबंधनात आडकले होते. त्यानंतर २०१९मध्ये दोघांना एक गोंडस मुलगी देखील झाली. परंतु, त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला नविनाने मुलाखत दिली होती. यामध्ये तिने सांगितले होते की, ती तीन महिन्यांपूर्वी पती जीत करणपासून वेगळी झाली होती. लवकरच कायदेशीर प्रक्रिया सुरु करून दोघे अधिकृत घटस्फोट घेतील. करण आणि नविना यांनी त्यांच्या ५ वर्षांच्या मुलीला एकत्र वाढवणायाच्या निर्णय घेतला आहे. आठवड्यातील दोन दिवस जीत त्यांच्या मुलीसोबत वेळ घालवू शकतो, असे तिनं सांगितले. नविना बोलेने घटस्फोटाचं स्पष्ट कारण सांगितलं नाही. परंतु लग्नाच्या काही वर्षांमध्ये सर्वकाही बदलले. आम्ही आमच्या मुलीचा विचार करून नातं टिकवण्याचा प्रयत्न केला परंतु काही निष्कर्ष नाही निघाल्यामुळे आम्ही सहमतीने आणि शांतपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतला, असं देखील नविनाने सांगितले.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT