Sydney Sweeney Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sydney Sweeney: बॉलिवुडकडून ५३० कोटींची ऑफर, प्रियंका- कतरिनाला मागे टाकणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

Bollywood Movie: देसी अभिनेत्रींना १२ ते १५ कोटी रुपये देणाऱ्या बॉलिवुडने विदेशी अभिनेत्रीला तब्बल ५३० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. या अभिनेत्रींनी प्रियंका, दीपिकाला देखील मागे टाकले.

Priya More

Summary -

  • सिडनी स्वीनीला बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी ५३० कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे.

  • प्रियंका चोप्रा आणि कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींना मागे टाकणारी ही अभिनेत्री आहे.

  • चित्रपटाची कथा एका अमेरिकन आणि भारतीय सेलिब्रिटीच्या प्रेमावर आधारित आहे.

  • सिडनीची जागतिक ओळख वाढवणारा हा प्रोजेक्ट आहे.

  • न्यूयॉर्क, पॅरिससारख्या शहरांमध्ये या चित्रपटाचे शूट होणार आहे.

हॉलिवूड स्टार सिडनी स्वीनी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या अभिनेत्रीची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे. सिडनी स्वीनीला भारतातील सर्वात बिग बजेट चित्रपटांपैकी एकामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. एका प्रॉडक्शन हाऊसने सिडनीला ४५ मिलियन पाउंड म्हणजेच ५३० कोटींची डील ऑफर केली आहे.

द सनच्या वृत्तानुसार, या डीलमध्ये ३५ मिलियन पाउंड (अंदाजे ४१५ कोटी रुपये) हे फी आणि १० मिलियन पाउंड (अंदाजे ११५ कोटी रुपये) हे स्पॉन्सरशिप डील्स अशी एकूण ५३० कोटींची डील ऑफर केली आहे. सिडनीच्या स्टार पावरचा उपयोग आपल्या चित्रपटाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये हिट करण्यास होईल अशी आशा निर्मात्यांना आहे.

हा संपूर्ण चित्रपट एका अमेरिकन स्टारभोवती फिरतो. जी एका भारतीय सेलिब्रिटीच्या प्रेमात पडते. २०२६ च्या सुरुवातीला न्यूयॉर्क, पॅरिस, लंडन आणि दुबईसारख्या शहरांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग होण्याची शक्यता आहे. एका सूत्राने सांगितले की, सिडनीला या ऑफरमुळे आश्चर्यचिकत झाली. कारण ४५ मिलियन पाउंड ही खूपच मोठी रक्कम आहे. हा प्रोजेक्ट खूप मनोरंजक आहे आणि त्यामुळे तिची जागतिक ओळख आणखी वाढू शकते. भारतीय फिल्म इंडस्ट्री वेगाने वाढत आहे आणि हा चित्रपट आपल्या फिल्म इंडस्ट्रीला जागतिक स्तरावर पोहचण्यासाठी बनवला जात आहे.

सुत्रांनी पुढे असे सांगितले की, सिडनीसाठी ही एक उत्तम संधी आहे. ती तिच्या पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करत आहे. पैसा हेच सर्वस्व नाही आणि तिच्याकडे आधीच अनेक प्रोजेक्ट आहेत. पण हा चित्रपट तिला अभिनेत्री म्हणून नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो.' सिडनीच्या टीमकडून अद्याप याबाबत काहीच सांगण्यात आले नाही.

सिडनी स्वीनीला ' Euphoria' आणि 'The White Lotus' या टीव्ही मालिकांमुळे प्रसिद्धी मिळाली. ती लवकरच 'Christy' चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये ती Sports Illustrated च्या मुखपृष्ठावर झळकणारी अमेरिकेची पहिली महिला बॉक्सर क्रिस्टी मार्टिनची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात बेन फोस्टर आणि मेरिट वेव्हर यांच्याही भूमिका आहेत आणि हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Schemes : बचत छोटी नफा मोठा ! महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या खास 4 योजना

India Semiconductor Mission : बेंगळुरूमध्ये डिझाइन होणार जगातील सर्वात प्रगत 2nm चिप्स; एआरएमच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

Bachchu Kadu: शेतकऱ्यांसह बच्चू कडू गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले|VIDEO

Ashish Damle : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा; अजित पवार गटाच्या पारड्यात आणखी एक मंत्रिपद

Ashram School : वर्षभरापासून पोल्ट्री फार्ममध्ये भरतेय आश्रम शाळा; १२ कोटीची सुसज्ज शाळेची इमारत पडून

SCROLL FOR NEXT