
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पूर्व भागातील रिंगरोडच्या कामाला गावगुंडांचं ग्रहण लागलं आहे. गावगुंडांकडून रस्त्याचं काम करणाऱ्या मजुरांना तसेच प्रोजेक्ट मॅनेजरलाच धमक्या दिल्या जात आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. एमएसआरडीसीच्या वतीने हाती घेतलेला रिंगरोड हवेली तालुक्यातून जातो. तालुक्यातील १५ गावांत रिंग रोडचं काम सध्या सुरु आहे. यामध्ये तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगावमूळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची या गावांचा समावेश आहे.
बिवरी (ता. हवेली) येथील गोते मळा परिसराअंतर्गत रिंग रोडचं काम सुरु आहे. याठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना आणि प्रोजेक्ट मॅनेजरलाच एका गाव गुंडाकडून काम सुरू केल्यास हात-पाय तोडण्याची धमकी देण्यात येत आहे. 'ही शेवटची वार्निंग आहे, काम सुरू ठेवल्यास हातपाय मोडू' अशा धमकीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. गावगुंडाच्या धमकीनंतर मजुरांनी काम थांबवलं आहे.
दरम्यान, पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याचा थरार पाहायला मिळालाय. बिबेवाडीत भर रस्त्यावर कोयत्याने झालेल्या तुफानी हाणामारीनं नागरिकांची झोप उडवली. १७ एप्रिल रोजीच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे. या प्रकरणी बिबेवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार, सतीश पवार यांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी अटक करून आरोपींना न्यायालयात हजर केलं. कोर्टाने भिसे व पवार या सगळ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना तात्काळ न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता त्यांना जामीन दिल्यास ते पुरावे नष्ट करू शकतात किंवा पुन्हा गुन्हा करु शकतात. या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. घटनेमागचं नेमकं कारण काय होतं, हे शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तसेच आरोपींच्या मोबाईल तपासणीद्वारे कोणत्या टोळीशी त्यांचा संबंध आहे का, हे शोधलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.