Shirdi Bomb Threat: पाईप बॉम्बने उडवून देऊ अन्..; शिर्डीतील साईंच्या संस्थानला धमकीचा मेल, शिर्डीत खळबळ

Shirdi Police Investigate Threat Mail to Sai Baba Temple: शिर्डीच्या साईबाबा संस्थानला पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल २ मे रोजी सकाळी मिळाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Shirdi Sai Baba
Shirdi Sai Baba Saam tv
Published On

शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साई मंदिर भीषण पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. हा मेल साई संस्थानला २ मे रोजी सकाळीच प्राप्त झाला असून, धमकीचा मेल मिळाल्यानंतर साई संस्थानसह पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. तसेच साई मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेतही वाढ करण्यात आली आहे. हा धमकीचा मेल नेमका कुणी पाठवला, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना हा धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. या मेलद्वारे साई संस्थानला भीषण पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Shirdi Sai Baba
Hingoli: भरधाव डंपर बाजारपेठेत शिरला, नागरिकांना चिरडत रिक्षाला धडकला, दोघांचा मृत्यू; हिंगोलीत अपघाताचा थरार

यापूर्वी देखील धमकीचे फेक मेल अज्ञातांकडून पाठवण्यात आले होते. मात्र, ते धमकीचे मेल फेक असल्याचं आढळून आले होते. त्यामुळे २ मे रोजी पाठवण्यात आलेला मेल फेक आहे की, कुणाचा खोडसाळपणा, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या धमकीच्या मेलमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Shirdi Sai Baba
बांधकाम मजुराची धारदार शस्त्राने हत्या, मृतदेह तिथेच फेकून दिला अन्.. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड | Nagpur

दरम्यान, साई संस्थानला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या मेलमुळे भाविक आणि परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, साई संस्थांकडे स्वतःच्या सुरक्षा यंत्रणेसह महाराष्ट्र पोलिसांची मोठी सुरक्षा यंत्रणा असल्यामुळे, साई भक्तांनी निःसंकोच दर्शनाला यावे असे आवाहन साई संस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे.

Shirdi Sai Baba
Jalgaon: मासिक पाळीत स्वंयपाक, सासू-नणंदेकडून बेदम मारहाण अन् गळा दाबून हत्या; जळगावमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com