Better Half Chi Love Story : 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' घरबसल्या पाहा; सुबोध भावेचा चित्रपट ओटीटीवर, वाचा अपडेट

Better Half Chi Love Story OTT Release : 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. यात सुबोध भावे, रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहेरे हे लोकप्रिय कलाकार झळकले आहेत.
Better Half Chi Love Story OTT Release
Better Half Chi Love Storysaam tv
Published On
Summary

'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे.

'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी'मध्ये सुबोध भावे, रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहेरे हे कलाकार झळकले आहेत.

'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' हा कॉमेडी ड्रामा आहे.

मराठी कलाकार सुबोध भावे, रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहेरे यांचा 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' (Better Half Chi Love Story) चित्रपट थिएटरमध्ये खूप गाजला. 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' चित्रपट गृहात 22 ऑगस्टला रिलीज झाला. आता हा चित्रपट ओटीटीवर येणार आहे. 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' चित्रपट 19 सप्टेंबर 2025 पासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अल्ट्रा झकास मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' हा चित्रपट संजय अमर दिग्दर्शित आणि रजत अग्रवाल निर्मित आहे. चित्रपटात रोमान्स, कॉमेडी आणि थरारक गूढ पाहायला मिळते. 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' चित्रपटाची गोष्ट एका विवाहित माणसाच्या आयुष्याभोवती फिरते. ज्याचे नशीब एका वादात त्याच्या पझेसिव्ह आणि सतत कुरकुर करणाऱ्या बायकोच्या अनपेक्षितपणे मृत्यूने बदलते. त्याला वाटते की अखेर त्याला स्वातंत्र्य मिळाले. परंतु काही अप्रत्याशित घटना घडतात.

'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' चित्रपटात सुबोध भावे मुख्य भूमिकेत असून त्याच्या मृत बायकोचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करतो. ज्यामुळे त्याच्या जीवनात अनोखे गोंधळ निर्माण होतात. या परिस्थितीतील प्रसंगांमध्ये हास्याचा तडका, रोमँटिक अंदाज आणि थरारक ट्विस्ट प्रेक्षकांना अनुभवता आले. मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकार चित्रपटात पाहायला मिळत आहे.

सुबोध भावे, रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहरे यांच्या अफलातून अभिनयाने सजलेला 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' चित्रपट प्रेक्षकाला खळखळून हसवतो. कलाकारांनी त्यांच्या भूमिकेतून कथेला जिवंतपणा आणला आहे. कथानक अधिक रंगीत आणि भावनिक बनवले आहे. हा चित्रपट मराठी रसिकांसाठी आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी आनंद देणारा आहे. तो प्रेमाचे विविध रंग आणि मानवी नात्यांचे गुंतागुंतीचे पैलू उलगडतो. थरारक ट्विस्ट्स आणि हलक्या-फुलक्या हास्याच्या प्रसंगांनी भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांना बांधून ठेवतो.

Better Half Chi Love Story OTT Release
Dashavatar Collection : 99 रुपयांच्या ऑफरची जादू; मंगळवारी 'दशावतार' हाऊसफुल, कमाईचा आकडा किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com