Swara And Fahad Family New Born Baby Celebration Instagram
मनोरंजन बातम्या

Swara Bhaskar Baby Celebrate 6th Day: ‘राबिया’च्या येण्यानं सगळेच खुश, स्वरा- फहादने फॅमिलिसोबत केलं जंगी सेलिब्रेशन

Swara And Fahad Family New Born Baby Celebration: नुकतंच स्वरा आणि फहाद या दोघांच्याही फॅमिलीने एकत्र येत बाळाच्या जन्माचे स्पेशल सेलिब्रेशन केले आहे.

Chetan Bodke

Swara And Fahad Family New Born Baby Celebration

कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या स्वरा भास्करने नुकतीच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. स्वरा भास्करने २५ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. स्वरा आणि फहाद हे दोघेही आई- बाबा झाल्यानंतर दोघांच्याही घरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकतंच दोघांचीही फॅमिली एकत्र येत त्यांनी बाळाच्या जन्माचे स्पेशल सेलिब्रेशन करण्यात आलंय.

दरम्यान, स्वराने २३ सप्टेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यावेळीच अभिनेत्रीने आपल्या मुलीचे नावही जाहीर केले, तिच्या मुलीचे नाव ‘राबिया’ असं ठेवण्यात आले आहे. ‘राबिया’ काल सहा दिवसांची झाली असून तिची काल छठी साजरी करण्यात आली. काल अभिनेत्रीने आपल्या लेकीची छठी साजरी करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी कार्यक्रमाला त्यांच्या काही नातेवाईकांनी हजेरी लावली होती.

Swara Ahmad Born Baby (1)

स्वराने तिच्या मुलीच्या छठीचे फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीतून काही फोट शेअर केलेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वरा आणि फहादने आपल्या लेकीला मांडीवर घेतलेले आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने ‘राबिया रामा अहमद की छठी’ अशा आशयाचं कॅप्शन देत फोटो शेअर केला. तर शेअर केलेल्या पुढच्या फोटोंमध्ये स्वराचे दोन्ही कुटुंबीय राबियावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसून येत आहे, तिचे खुपसारे लाड करताना दिसून येत आहे. तर शेवटच्या फोटोमध्ये राबियाचे दोन्ही आजोबा त्यांच्या नातीकडे लाडाने पाहत आहेत.

Swara Ahmad Born Baby (2)
Swara Ahmad Born Baby (3)

नुकतंच स्वराने एक पोस्ट शेअर करत मुलीचे नाव सांगितले होते. स्वराने आणि फहाद अहमदने आपल्या लेकीचे नाव ‘राबिया’ असं ठेवले आहे. त्यांनी त्यांच्या मुलीच्या नावाचा अर्थ सुद्धा सांगितलाय. अभिनेत्रीने मुलीचे नाव एका सुफी संताच्या नावावरुन ठेवले आहे. ‘राबिया बसरी’ इराकमधील एक सुफी संत होत्या. त्यांना इराकच्या पहिल्या महिला सूफी संत म्हणून मानलं जायचं. त्या एक अतिशय बलवान महिला होती, त्यांनी आपलं सर्व आयुष्य गरिबी आणि उपासनेतच घालवले.

Swara Ahmad Born Baby (4)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT