नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला फुल्ल टू एन्टरटेन्मेंट करण्यासाठी वेगवेगळ्या धाटणीचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘फुक्रे ३’ (Fukrey 3), ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War), ‘चंद्रमुखी २’ (Chandramukhi 2) अशे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तीनही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे असून प्रेक्षकांनी या चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद दिलेला आहे.
पहिल्या विकेंडला तिनही चित्रपटांना दिलासादायक प्रतिसाद मिळाला आहे. काही चित्रपटांचा कमाईचा आलेख चढता आहे, तर काही चित्रपटांच्या कमाईचा आकडा खाली घसरताना दिसत आहे. चला तर जाणून घेऊया तिसऱ्या दिवशी या तिनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कशी कमाई केली आहे.
‘फुक्रे ३’ (Fukrey 3) ची कमाई
मृगदिप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुक्रे ३’ (Fukrey 3) ने पहिल्या दिवसापासून आपल्या कमाईचा आलेख चढताच ठेवला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.८२ कोटींची कमाई तर, दुसऱ्या दिवशी ७.८१ कोटींची कमाई केली. सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ११. ३० कोटींचा टप्पा गाठला आहे.
चित्रपटाचा वाढता आलेख पाहून निर्मात्यांसह दिग्दर्शक आणि चित्रपटातील कलाकारसुद्धा प्रचंड आनंदित आहेत. चित्रपटाने तीन दिवसात २८ कोटींचा टप्पा गाठला आहे. या आधीसुद्धा चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यांनाही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता.
‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War)ची कमाई
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. प्रदर्शनाआधीच प्रकाशझोतात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली खास जादु दाखवण्यात अयशस्वी ठरला आहे. चित्रपट तीन दिवसात साधा ५ कोटींचाही टप्पा गाठु शकला नाही.
दरम्यान, चित्रपटाने पहिल्या दिवशी ८५ लाख, दुसऱ्या दिवशी फक्त ९ लाख तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने १. ५० कोटींचा टप्पा गाठला आहे. सॅकल्निकच्या अहवालानुसार चित्रपटाने तीन दिवसात जेमतेम ३.२५ कोटींचाच आकडा गाठलाय.
चित्रपटाची कथा वैश्विक कोरोना महामारीमध्ये ज्या लसींनी अवघ्या जगाला वाचवले, त्या व्हॅक्सिनवर हा चित्रपट आधारित आहे. विज्ञानावर आधारित असलेल्या या कथेला मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळेल अशी आशा होती, पण तसे चित्र फारसे दिसून येत नाही.
‘चंद्रमुखी २’ (Chandramukhi 2)ची कमाई
बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौतच्या या ‘चंद्रमुखी २’ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर आपली खास जादु दाखवली नाही. प्रदर्शनाआधी प्रचंड चर्चेत असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना विशेष आकर्षित करु शकला नाही.
चित्रपटाने पहिल्या दिवशी ८. २५ कोटी, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४. ३५ कोटी तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ५ कोटींचा टप्पा पार केला आहे. सॅकल्निकच्या अहवालानुसार या चित्रपटाने तीन दिवसात एकूण १७. ६० कोटींचा आकडा गाठला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.