Van Damme Split Stunt: हॉलिवूड सुपरस्टारने अजय देवगणचा आयकॉनिक स्टंट केला रिक्रिएट, Van Damme च्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Hollywood Superstar Van Damme: अजय देवगणच्या या स्टंटची भूरळ हॉलिवूडच्या सुपरस्टारला देखील लागली आहे.
Van Damme Split Stunt
Van Damme Split StuntSaam Tv
Published On

Ajay Devgn Phool Aur Kaante Movie Stunt:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार अजय देवगणचा 'फूल और कांटे' हा सुपरहिट चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यामागचे कारण म्हणजे या चित्रपटात अजय देवगणने दोन बाईकवर उभं राहून केलेला आयकॉनिक स्टंट. या स्टंटमुळे आजही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंती मिळते. या स्टंटची अजय देवगणने त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये पुनरावृत्ती केली आहे. अजय देवगणच्या या स्टंटची भूरळ हॉलिवूडच्या सुपरस्टारला देखील लागली आहे. हॉलिवूड अभिनेता व्हॅन डॅमने त्याच्या एका जाहिरातीत असाच एक स्टंट केला आहे. त्याचा हा स्टंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Van Damme Split Stunt
Khichdi 2 Teaser: टायगर आणि पठाननंतर मोठ्या मिशनवर जाणार पारेख कुटुंब; 'खिचडी 2'चा भन्नाट कॉमेडी टीझर प्रदर्शित

व्हॅन डॅमच्या स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हॅन डॅमची ही जाहिरात ९ दिवसांत ४८ मिलियन वेळा आणि एकूण ११५ मिलियन वेळा पाहिली गेली आहे. या जाहिरातीत अभिनेता व्हॅन डॅम दोन व्हॉल्वो ट्रकवर पाय ठेवून उभा राहिला आहे. हे दोन्ही ट्रक एकत्र पुढे जात आहेत. जाहिरातीमध्ये सुरुवातीला व्हॅन डॅमचा चेहरा दाखवण्यात आला आहे. त्यानंतर ट्रकवर उभं राहून व्हॅन स्टंट करताना दिसत आहे. व्हॅन डॅमचा हा स्टंट पाहून सगळ्यांना अजय देवगणची आठवण आली. या जाहिरातीमुळे इंटरनेटवर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

Van Damme Split Stunt
IBD 3 Winner: चतुर मिनिस्टर समर्पण लांबा झाला 'India's Best Dancer 3'चा विजेता

व्हॅन डॅमच्या जाहिरातीच्या सुरुवातीला दिसत आहे की, हॉलिवूड अभिनेता व्हॅन डॅम स्टंट करताना त्याच्या आयुष्यात पाहिलेल्या खराब रस्त्यांबद्दल बोलतो. यानंतर तो सांगतो की त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांमुळे त्याचे शरीर परिपूर्णतेसाठी कसे तयार झाले. जाहिरातीमध्ये सुरुवातीला फक्त व्हॅनचा चेहरा दिसत असतो. त्यानंतर वाईल्ड कॅमेरा अँगल दिसतो ज्यामध्ये व्हॅन डॅम दोन व्होल्वो ट्रकवर पाय ठेवून उभा राहिलेला दिसत आहे. हे दोन्ही ट्रक हळूहळू पुढे जात त्यांच्यामधील अंतर वाढते. त्यानंतर व्हॅन डॅम आपल्याला एका एपिक स्प्लिटमध्ये दिसतो. व्हॅन डॅमला हा स्टंट करून १० वर्षे झाली आहेत आणि चाहत्यांना अजूनही हा व्हिडीओ आवडत आहे.

दरम्यान, ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये भरभरून कमेंट्स केल्या आहेत. व्हॅन डॅमची जाहिरात पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. एका युजरने लिहिले, 'त्याने हा स्टंट कसा केला?' दुसऱ्याने विचारले, 'यासाठी किती टेक लागले?' तिसऱ्याने विचारले, 'स्टंट करण्यापूर्वी व्हॅन डॅमने काय विचार केला असेल?' २०२१ मध्ये अजय देवगणने देखील असाच एक स्टंट केला होता. ज्यामध्ये त्याने दोन ट्रकच्या वर उभे राहून स्प्लिट केले होते. त्याचा हा स्टंट व्हिडीओ त्यावेळी खूपच व्हायरल झाला होता. तसंच त्याच्या चाहत्यांकडून या व्हिडीओला पसंती देखील मिळाली होती.

Van Damme Split Stunt
Fukrey 3 And The Vaccine War 3rd Day Collection: वीकेंडला ‘फुक्रे ३’ ला भरघोस प्रतिसाद, ‘चंद्रमुखी २’ आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’ कोमात, तिसऱ्या दिवशीचे आकडे समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com