२७ फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस म्हणजेच, 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din 2024). महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) उर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये २७ फेब्रुवारी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करतात. अशातच ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त अभिनेता स्वप्नील जोशीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलांसोबत एक व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. “आमच्या कडून तुम्हा सर्वांना “मराठी भाषा गौरव” दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !” असं कॅप्शन देत अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. इन्स्टाग्रामवर स्वप्नील जोशीसह सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, अभिजीत केळकर अशा अनेक मराठी कलाकार मंडळींनी प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अवघ्या काही तासांपूर्वीच स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या मुलांबरोबर शुभेच्छा देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत स्वप्नील मुलांना म्हणतो, “चला नावं सांगा आपली आपली” तेव्हा त्यांच्या मुलांनी राघव आणि मायरा असे नावं सांगतात. त्यानंतर स्वप्नील आणि त्याची दोन्ही मुले प्रेक्षकांना, “आमच्यातर्फे तुम्हा सर्वांना ‘मराठी भाषा दिना’च्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद, जय महाराष्ट्र!” असं म्हणत आहेत. स्वप्नीलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या असून लाईक्सचा वर्षाव केला आहे.
स्वप्नीलच्या कामाबद्दल सांगायचे तर, चित्रपट निर्माते परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून स्वप्नील जोशी निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण करीत आहे. त्यासोबतच ‘वाळवी २’, ‘जिलेबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात स्वप्नील दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.