आज २७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करतो. या दिवसाचे खास औचित्य साधत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी मराठी प्रेक्षकांसाठी मोठी घोषणा केली आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आजवर निखळ मनोरंजन केले आहे. प्रशांत दामले कायमच चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत असतात. आज ‘मराठी भाषा गौरव दिन’चे औचित्य साधत ‘तिकिटालय’ या मराठमोळ्या मनोरंजनात्मक व तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ केला आहे.
‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभमुहूर्तावर ‘तिकीटालय’ तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. यावेळी कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे, अभिनेता संकर्षण कऱ्हाडेसह आदी मान्यवर या बुकिंग ॲपच्या शुभारंभ सोहळ्याला उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते या बुकिंग ॲपचे लॉंचिंग करण्यात आले. या सोहळ्याला, ॲपचा कसा वापर करावा, ॲपची वैशिष्ट्ये त्यांनी प्रेक्षकांना सांगितली आहे.
‘तिकिटालय’ ॲपबद्दल प्रशांत दामले म्हणाले की, “मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी काही तरी करावं, यासाठी गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून माझ्या डोक्यात अनेक इच्छा होत्या. त्यावेळी मला, ‘तिकीटालय’ तिकीट बुकिंग ॲपची संकल्पना मला सुचली. या तिकीट बुकिंग ॲपवर प्रेक्षकांना मराठी चित्रपटाबद्दल आणि नाटकाबद्दल माहिती मिळणार आहे. कोणतं नाटक कुठे सुरू आहे? कोणतं नाटक आता बंद झालं? याची सगळी माहिती तुम्हाला अगदी सहज या ॲपवर मिळेल. या ॲपचा फायदा प्रेक्षकांना सर्वाधिक होणार आहे.” सोबतच अभिनेत्याने यावेळी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी येत्या काळात या बुकिंग ॲपचा वापर करावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.