Sonalee Kulkarni: बाराखडी गिरवताना कुठे माहित होतं?, सोनाली कुलकर्णीने मराठी भाषा दिनानिमित्त केलेली पोस्ट चर्चेत

Sonalee Kulkarni Photoshoot: आज मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) आहे त्यानिमित्ताने सोनाली कुलकर्णीने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. सोनाली कुलकर्णीने या पोस्टमध्ये स्वत:चे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
Sonalee Kulkarni
Sonalee KulkarniSaam TV
Published On

Sonalee Kulkarni Post On Marathi Bhasha Gaurav Din:

मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नवनवीन फोटोशूट, नवीन प्रोजेक्ट, आयुष्यातील नव्या घडामोडी यांची सर्व माहिती ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. या पोस्टमुळे सोनाली कुलकर्णी नेहमीच चर्चेत राहते. आज मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) आहे त्यानिमित्ताने सोनाली कुलकर्णीने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. सोनाली कुलकर्णीने या पोस्टमध्ये स्वत:चे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून ते व्हायरल होत आहेत.

आज मराठी भाषा गौरव दिन आहे. त्यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडीत, अभिजीत केळकर यासारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. अशामध्ये सोनाली कुलकर्णीने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. सोनालीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने सुंदर कॅप्शन दिले आहे. या कॅप्शननेच सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टसोबत तिने सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

सोनाल कुलकर्णीने नुकताच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने लाल काठ असलेली केशरी रंगाची साडी नेसली आहे. सोनाली कुलकर्णीने गळ्यामध्ये घातलेला नेकलेस खूपच सुंदर आहे. सध्या तिच्या या युनिक नेकलेसचीच चर्चा होत आहे. तिने गळ्यामध्ये घातलेल्या नेकलेसवर बाराखडी लिहिली आहे. सोनालीने या साडीवर लाईट मेकअप, मोकळे केस आणि कपाळावर चंद्रकोर लावून आपला लूक परिपू्र्ण केला आहे. सोनालीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये , 'बाराखडी गिरवताना कुठे माहीत होतं? पुढे, हाती खजीना लागणारे! #मै . @maithilyapte मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.', असे लिहिले आहे.

Sonalee Kulkarni
२३ वर्षीय अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू, ४ नवोदित कलाकारांसह ९ जणांनी गमावला जीव

सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी पसंती देत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. त्याचसोबत या पोस्टला सुंदर कॅप्शन दिल्याचे देखील तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, सोनाली कुलकर्णीचा ‘मलाइकोट्टई वालीबान’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. हा तिचा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत असून ते तिच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. सोनाली कुलकर्णी लवकरच ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजे २२ मार्चला रिलीज होणार आहे.

Sonalee Kulkarni
Ketaki Chitale: केतकी चितळेचे अ‍ॅट्रॉसिटीबाबत वक्तव्य, व्हिडीओ होतोय व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com