Ketaki Chitale: केतकी चितळेचे अ‍ॅट्रॉसिटीबाबत वक्तव्य, व्हिडीओ होतोय व्हायरल

Brahmin Unity Council: केतकी चितळेने ॲट्रॉसिटीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. परळीतील ब्राह्मण ऐक्य परिषदेतील (brahmin unity council) तिच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ketaki Chitale
Ketaki Chitale Saam Tv
Published On

Ketaki Chitale Post:

मराठी सिनेसृष्टीची 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपली परखड मतं, वादग्रस्त पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सामाजिक असो वा राजकीय कोणत्याही विषयावर केतकी चितळे आपले मत मांडत असते. सोशल मीडियावर तिच्या पोस्ट नेहमी व्हायरल होतात. अनेकदा या पोस्टमुळे केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यामध्ये देखील सापडली आहे. केतकीला नेटझन्स देखील ट्रोल करतात. असे असताना देखील केतकी चितळे मात्र आपले मत मांडायला मागे हटत नाही. अशातच केतकी चितळेने ॲट्रॉसिटीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. परळीतील ब्राह्मण ऐक्य परिषदेतील (brahmin unity council) तिच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केतकी चितळेने परळी येथे नुकताच ॲट्रॉसिटी करणाऱ्यांचे रॅकेट सुरु असल्याचे वक्तव्य केले. परळीतील ब्राह्मण ऐक्य परिषदेत तिने हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या भाषणाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. परळी येथे ब्राह्मण समाजाची राज्यस्तरीय परिषद झाली. यावेळी केतकी चितळेने हजेरी लावली. या परिषदेमध्ये भाषण करत असताना केतकीने ॲट्रॉसिटी ॲक्टबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काही लोक ॲट्रॉसिटी ॲक्टचे रॅकेट चालवत असून याबाबत आरटीआय टाका आणि गेल्या ५ वर्षांची माहिती मिळवा, असे आवाहन तिने या परिषदेमध्ये उपस्थित असलेल्यांना केले आहे.

Ketaki Chitale
Shah Rukh Khan मुलगी सुहानासोबत करणाऱ्या चित्रपटाचं नाव ठरलं, 'या' दिवसापासून होणार शूटिंगला सुरूवात

केतकीने या परिषदेत पुढे असे देखील सांगितले आहे की, 'बरेच वकील आहेत. मुंबईत एक वकील आहे ज्यांनी गेल्या १५ ते २० वर्षांत ६५ ॲट्रॉसिटीच्या केसेस केल्या आहेत. अनेक प्रकरणात त्यांचा साक्षीदार एकच असतो. असे अनेक वकील आहेत. हे अख्ख रॅकेट असून त्यांचे जोरात काम सुरू आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा.', अशी मागणी केतकी चितळेने केली आहे. केतकी चितळे आता या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. केतकीवर टीका देखील होऊ लागली आहे.

अशातच, केतकी चितळेने फेसबुकवर देखील आणखी एक पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होत असून तिला ट्रोल केले जात आहे. या पोस्टमध्ये केतकीचा रोख नेमका कोणावर आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. केतकीने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'कालचा दिवस (रविवार) फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःचा कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक "महापुरुषांनी" एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली! ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये. असो. ।।जय हिंद।। ।।वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय।। ' केतकी चितळे तिच्या या पोस्टमुळे देखील चर्चेत आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com