Shah Rukh Khan मुलगी सुहानासोबत करणाऱ्या चित्रपटाचं नाव ठरलं, 'या' दिवसापासून होणार शूटिंगला सुरूवात

Shah Rukh Khan Upcoming Film: सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे.
Shah Rukh Khan And Suhana Khan
Shah Rukh Khan And Suhana KhanSaam Tv
Published On

Shah Rukh Khan And Suhana Khan Film:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2023 मध्ये बॅक टू बॅक ३ ब्लॉकबस्टर चित्रपटांची हॅटट्रिक दिल्यानंतर शाहरुख खानने त्याच्या पुढील चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार शाहरुख खानबद्दल चर्चा होती की, तो त्याची मुलगी सुहाना खानसोबत एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहे. मात्र, या चित्रपटाशी संबंधित माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाचे नाव 'किंग' ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही तर निर्माते हा चित्रपट लवकरच फ्लोरवर घेण्याची तयारी करत आहेत. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक सुजॉय घोष सुपरस्टार शाहरुख खान आणि सुहाना खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट तयार करणार आहे. विशेष म्हणजे 'पठान' फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदही निर्माता म्हणून या चित्रपटाशी जोडला गेला आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची तयारीही सुरू आहे. चित्रपटाशी निगडीत एका सूत्राने सांगितले की, 'सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष शाहरुख खान आणि सुहाना खानसोबत सतत चर्चेत असतात. ज्यासाठी ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत याबाबत अनेकदा चर्चा झाल्या. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सुजॉय सिद्धार्थ हा शाहरुख खानसोबत काम करत आहे. ज्यामध्ये जागतिक दर्जाचे ॲक्शन सीक्वेन्स असतील. जे सिद्धार्थ हाताळेल. हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार केला जाणार आहे.

Shah Rukh Khan And Suhana Khan
Titeeksha Tawde आणि Siddharth Bodke अडकले विवाहबंधनात, लग्नाचा क्युट व्हिडिओ आला समोर

एवढेच नाही तर महत्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान मे 2024 पासूनच या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. तसेच, या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतरच तो 'पठान 2'चे काम सुरू करणार आहे. ज्याचे शूटिंग 2025 पर्यंत सुरू होईल. 'पठान 2'मध्ये सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. हा चित्रफट 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Shah Rukh Khan And Suhana Khan
Pankaj Udhas Song List: 'चिट्ठी आई है' सह या गाण्यांच्या माध्यमातून पंकज उधास यांनी चाहत्यांच्या मनावर केलं राज्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com