ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

barvi dam News : ठाणेकरांची चिंता वाढली आहे. बारवी धरणात फक्त ३२.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
barvi dam
barvi dam News Saam tv
Published On

मान्सूनपूर्व पावसाने मारली दडी

रखरखते ऊन आणि वाढते बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी झालंय

पुढील काही आठवड्यांत पाऊस न झाल्यास पाणी कपातीची शक्यता

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे. बदलापूरमधील बारवी धरणातील पाणी पातळीत चिंताजनक घट नोंदवली गेली आहे. आता धरणात केवळ ३२.३१ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय. मान्सूनपूर्व पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात रखरखते ऊन, वाढते बाष्पीभवन प्रभावामुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जातंय.

धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यांचं जून अखेरीपर्यंत पर्यायाने मान्सून सुरू होईपर्यंत एमआयडीसी आणि पाटबंधारे विभागाला नियोजन करावं लागणार आहे. गेल्या वर्षींच्या तुलनेत या वर्षी पाण्याच्या पातळीत किंचित घट झालीये. २५ मे २०२६ रोजी आकडेवारीनुसार, धरणात ६०.७९ मीटर इतकी पाणी पातळी आहे. तर १०९.५१ दलघमी म्हणजेच ३२.३१ टक्के थेट पाणीसाठा उपलब्ध आहे.

barvi dam
कल्याण- डोंबिवलीत पाणीकपात, २ दिवस पाणी पुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

गेल्या वर्षी धरणातील पाणी पातळी ६०.८८ मीटर इतकी होती. एकंदरीत ११०.७० दलघमी म्हणजेच ३२.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा धरणातील पाणीसाठा कमी झालाय. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढू लागली आहे. घटत्या पाणी पातळीमागे हवामानात बदल हे मुख्य कारण मानलं जात आहे. गेल्या वर्षी १३ मेपासूनच मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती.

धरणात नव्या पाण्याची आवक सुरू झाली होती. आकाश ढगाळ राहिल्याने बाष्पीभवन कमी झालं होतं. मे महिना संपत आलाय, तरी पावसाचा मागमूस नाही. प्रखर ऊन्हामुळे धरणातील पाण्याने वेगाने बाष्पीभवन होऊ लागलं आहे. जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत चांगला पाऊस न झाल्यास ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होऊ शकते. त्यामुळे पाणी कपात केली जाण्याची शक्यता आहे.

barvi dam
निवडणुकीआधी पेटलं 'हलाल' राजकारण? गोकुळचा हलाल सर्टिफिकेटचा वाद कशाला?

बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली मीरा भाईंदर ,भिवंडी, ठाणे शहर अंबरनाथ, बदलापूर भागात पाणीपुरवठा केला जातो. तसेच औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा केला जातोय. यामुळे आता प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे भविष्यात पाणी कपातीची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com