पुण्यात धक्कादायक प्रकार! गॅस सिलेंडरमधून निघालं 10 लिटर पाणी

Pune Residents Furious After Water Flows from LPG Cylinder: तुमच्या घरात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसऐवजी थेट पाणी निघालं तर... विचार करूनच डोकं चक्रावून गेलं ना? मात्र, हे प्रत्यक्षात घडलंय. हो... नेमका हा प्रकार कुठे घडलाय? गॅसमध्ये पाणी नेमकं आलं कुठून? एजन्सींकडून गॅसची चोरी कशी सुरु आहे?
Residents in Pune demonstrate shocking incident as water pours out from a domestic LPG cylinder, raising serious concerns over gas safety and fraud.
Residents in Pune demonstrate shocking incident as water pours out from a domestic LPG cylinder, raising serious concerns over gas safety and fraud.saam tv
Published On

तुमच्या घरात येणाऱ्या गँसमध्ये तब्बल 10 लीटर पाणी असेल तर.... होय तुम्ही बरोबर ऐकताय... गँस सिलेंडरमधून गँसऐवजी थेट पाण्याची धरा वाहू लागलीय...पुण्यातील पर्वती परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार पाहून ग्राहकांचे डोकच गरगरले.. आधीच महागाईमुळे गॅसचे दर गगनाला भिडलेले असताना, आता थेट गॅस ऐवजी सिलेंडरमध्ये पाणी निघाल्यानं संतप्त पुणेकरांनी एजेन्सीबाहेर पोलिसांसमोरच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला...

दुसरीकडे भारत गॅसच्या घरगुती सिलेंडरमध्ये हा प्रकार घ़डल्यानं संतप्त नागरिकांनी एजन्सीच्या मॅनेजरलाही धारेवर धरलं...यापूर्वीही अशा तक्रारी एजन्सीकडे दाखल झाल्याचं सांगत नागरिकांनी मॅनेजरला जाब विचारला...मात्र एजन्सी मॅनेजरनं सिलेंडरमध्ये पाणी असल्याचे मान्य करत.... महिन्यातून कधीतरीच असा प्रकार घडतो, असं सांगत हात झटकले...

मात्र सिलेंडरमध्ये पाणी कसं येतं? फसवणुकीचे दोन पॅटर्न नेमके काय आहेत? पाहूयात...काही बेकायदेशीर गॅस एजन्सी चालक, वितरक किंवा डिलिव्हरी बॉईज सिलेंडरमधून एलपीजी गॅस चोरतात. त्यामुळे गॅस काढल्यानंतर सिलेंडरचे वजन कमी होऊ नये आणि वजन काट्यावर ते बरोबर दाखवावं, यासाठी त्यात 3 ते 4 लीटर किंवा त्याहून अधिक पाणी भरले जाते. दुसरीकडे गॅस कंपन्या काही वर्षांनी सिलेंडरच्या मजबुतीची आणि सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी 'हायड्रो-टेस्टिंग' करतात. या चाचणीदरम्यान सिलेंडरमध्ये पाण्याचा प्रचंड दाब दिला जातो. मात्र कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे सिलेंडर कोरडे न करताच गॅस भरल्यास त्यात पाणी राहू शकते...

मात्र गँस सिलेंडरमध्ये 10 लीटर पाणी हायड्रो टेस्टिंगदरम्यान राहणं अशक्य आहे... त्यामुळे हा हलगर्जीपणा नसून ग्राहकांची थेट फसवणूक करण्याचा आणि त्यांचा जीवाशी खेळण्याचा प्रकारआहे...आता लाखो ग्राहकांच्या खिशाला कात्री लावून फसवणुक करणाऱ्या गँस एजन्सीची अन्नपुरवठा आणि वैधमापन शास्त्र विभाग चौकशी करून कारवाई करणार का? राज्यात गँसमध्ये पाणी भरून ग्राहकांची फसवणुक करणाऱ्यांसाठी कोणते कडक नियम आणणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com