Neha Pendse Debut OTT: नेहा पेंडसेला लॉट्री लागली, लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार

Neha Pendse News: आपल्या अभिनयाच्या, डान्स शैलीच्या आणि फॅशनच्या जोरावर सिनेसृष्टीत छाप पाडणारी नेहा पेंडसे आता लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Neha Pendse Debut OTT
Neha Pendse Debut OTTInstagram
Published On

Neha Pendse Debut OTT

आपल्या अभिनयाच्या, डान्स शैलीच्या आणि फॅशनच्या जोरावर सिनेसृष्टीत छाप पाडणारी नेहा पेंडसे (Neha Pendse) आता लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी धाटणीच्या मालिकेतून नेहाने टीव्ही मालिकेत पुनरागमन केले होते. ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेमुळे नेहाला महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये प्रसिद्धी मिळाली आहे. आता, नेहा पेंडसे लवकरच ओटीटीवर झळकण्याची शक्यता आहे.

Neha Pendse Debut OTT
Ticketalay App: मराठी मनोरंजनाचं मराठी ॲप आलंय ‘तिकिटालय’, प्रशांत दामलेंनी सांगितली खासियत

वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ही नेहा लवकरच OTT क्षेत्रामध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा होत आहे. नेहाने मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपल्या ग्लॅमरस लूक आणि फॅशन शैलीमुळे ती प्रसिद्धीझोतात आली आहे.

सध्या सोशल मीडियावर नेहा ओटीटी क्षेत्रामध्ये डेब्यू करणार अशी चर्चा सुरू आहे. तिच्या ओटीटी डेब्यूची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेहा पेंडसे लवकरच एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ओटीटी क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मात्र, तिची भूमिका काय असणार ?, कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार ? याबाबतची माहिती सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

Neha Pendse Debut OTT
Sonalee Kulkarni: बाराखडी गिरवताना कुठे माहित होतं?, सोनाली कुलकर्णीने मराठी भाषा दिनानिमित्त केलेली पोस्ट चर्चेत

नेहाने आपल्या सिनेकारकिर्दित मराठी, हिंदी आणि टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह टीव्ही मालिकेतही तिने आपली छाप सोडली आहे. ‘मे आय कम इन मॅडम?’ आणि ‘भाभी जी घर पर है’ या सिरीयलमुळे मिळालेल्या उत्तुंग यशामुळे आणि प्रतिसादामुळे नेहा पेंडसे कमालीची चर्चेत आली होती.

२०११ मध्ये झी मराठीवर टेलिकास्ट झालेल्या ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतही तिने प्रमुख भूमिका केली होती. 'बिग बॉस १२'मध्ये (Bigg Boss) नेहानं स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. नेहाने आजवर अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे. नेहाच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत.

Neha Pendse Debut OTT
२३ वर्षीय अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू, ४ नवोदित कलाकारांसह ९ जणांनी गमावला जीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com