संजय कपूर यांच्या प्रॉपर्टीच्या वादात मोठी अपडेट समोर आली आहे.
करिश्मा कपूरच्या वकिलांनी करिश्माला प्रॉपर्टीतले काही नको असल्याचे म्हटले आहे.
करिश्मा कपूर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लढत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आहेत. अलिकडेच 12 जूनला संजय कपूर यांचे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी संजय कपूर यांच्या प्रॉपर्टीवरून वाद (Sunjay Kapur Property Case) सुरू झाले. आता त्यात एक मोठी अपडेट समोर आली आहे. करिश्माच्या मुलांनी वडील संजय कपूर यांच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीत वाटा मिळवण्यासाठी कोर्टात गेले. समायरा आणि कियान कपूर दोन्ही मुलं सावत्र आई प्रिया सचदेव हिच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
करिश्मा या लढ्यात आपली दोन्ही मुलं समायरा आणि कियान कपूर यांचे प्रतिनिधित्व करत आहे. करिश्माच्या वकिलांनी सांगितल्यानुसार,संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीतून करिश्माला एकही रुपया नको. ती फक्त मुलांसाठी लढत आहे. त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे हा तिचा हेतू आहे.
करिश्मा कपूरच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कपूरने एक करार केला होता. ज्यात भारतातील, कॉर्पोरेट आणि परदेशी प्रॉपर्टीचा समावेश होता. त्यांचे एक इच्छापत्र देखील आहे. मात्र ते नोंदणीकृत नाही. हा वाद इच्छापत्रातील प्रॉपर्टीसाठी आहे. ट्रस्टच्या मालमत्तेबाबत नाही. मात्र संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्माच्या मुलांना वडीलांच्या संपत्तीतून फक्त 1,900 कोटी रुपये दिले जाणार आहेत. समायरा आणि कियान यांनी इच्छापत्र खोट असल्याचे सांगितले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दिवंगत संजय कपूर यांची एकूण संपत्ती 30,000 कोटी आहे. संजय जे. कपूर हे सोना कॉमस्टार या भारतीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष होते. करिश्मा कपूरने 2003 मध्ये संजय कपूरशी लग्नगाठ बांधली. तर 2016 ला त्यांचा घटस्फोट झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.