'ठरलं तर मग' मालिकेत सुभेदारांच्या घरी प्रियाची पुन्हा एन्ट्री होणार आहे.
सायली प्रियाला पाहताच घराच्या बाहेर काढते.
सायली रागात प्रियाच्या थोबाडीत मारते.
'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिकेत सायली-अर्जुनच्या आयुष्यात पुन्हा मोठे वादळ येणार आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर काही दिवस तुरुंगवास भोगल्यावर सध्या प्रियावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेलमध्ये राहायला नको म्हणून प्रियाने आजारपणाचे नाटक केले आहे. मात्र आता प्रिया रुग्णालयातून सुटून सुभेदारांच्या घरी येणार आहे. ज्यामुळे सायली पुन्हा अडचणीत येणार आहे.
'ठरलं तर मग' च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वजण डायनिंग टेबलावर बसलेले असतात. तेव्हा सायली म्हणते की, "आता गणपतीनंतर दसऱ्याची तयारी करण्याची वेळ झाली." तेवढ्यात तन्वी आणि अश्विन घराच्या उंबरठ्यावर येतात. तन्वी म्हणते "म्हणूनच मी आली आहे..."
तन्वीला पाहून घरातील सर्वजणांना खूप राग येतो. सायली "खबरदार माझ्या घरात पाऊल टाकले तर..." असे म्हणून तन्वीच्या थोबाडीत मारते. परत सायली बोलते की, "एवढे सर्व होऊनही निर्लज्जासारखी माझ्या घरात आलीस." तेवढ्यात अश्विन बोलतो की, "कायद्याने ती आता..." पण सायली त्याला थांबवते. त्यानंतर सायली तन्वीला हाताला धरून घराच्या बाहेर काढते आणि म्हणते की, "कायद्याने तुझी सुटका केली असेल, पण या घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही. "
'ठरलं तर मग' च्या येणाऱ्या भागांमध्ये प्रिया कोणता नवा डाव खेळणार, सायली-अर्जुनच्या आयुष्यात कोणते नवीन संकट येणार हे सर्व पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच घरातून बाहेर काढली गेलेली प्रिया आता कुठे जाणार, सायलीचा भूतकाळ अर्जुनसमोर कधी येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'ठरलं तर मग' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 8:30 वाजता पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.