'Bigg Boss 19'च्या घरात आठवडाभर चालणार 'या' सदस्याची सत्ता, नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss 19 Third Week Captain : 'बिग बॉस 19'च्या घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. ज्यात तुफान भांडणे होताना दिसली. नवीन कॅप्टन कोण ठरला, जाणून घेऊयात.
Bigg Boss 19 Third Week Captain
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

सलमान खानचा 'बिग बॉस 19' हा रिॲलिटी शो चांगलाच चर्चेत आहे.

'बिग बॉस 19'चा तिसरा कॅप्टन ठरला आहे.

मृदुल तिवारी आणि अमाल मलिक हे कॅप्टन्सीचे दोन दावेदार शेवटी राहतात.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19 ) घरात पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले आहे. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. आता 'बिग बॉस 19'च्या घरात तिसरा कॅप्टन ठरवण्यात आला आहे.'बिग बॉस 19'ची पहिली कॅप्टन कुनिका सदानंद झाली. मात्र घरातील सदस्यांनी मिळून कुनिकाला कॅप्टन्सी सोडायला लावली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात बसीर अली कॅप्टन झाला. त्याच्या कॅप्टन्सी काळात घरात खूप राडा पाहायला मिळाला.

कॅप्टन्सी टास्क

कॅप्टन्सी टास्क रेड आणि ब्लू अशा दोन टीममध्ये पार पडला. टास्कच्या शेवटी टीम रेडचा मृदुल तिवारी आणि अमाल मलिक यांच्यापैकी एकाची निवड करावी लागली. असेंब्ली रूममध्ये अमाल आणि मृदुल यांना समान मते मिळाली. दोघांमध्ये बरोबरी झाली. मात्र पुन्हा मतदान झाल्यानंतर,अमाल मलिक ( Amaal Mallik) घराचा नवीन कॅप्टन बनला. या आठवड्यात बिग बॉसची सत्ता गायकाच्या हातात असेल.

कॅप्टन्सी टास्क दरम्यान बसीर अली आणि अभिषेक बजाज यांच्यामध्ये मोठे भांडण होते. बसीर अभिषेकवर टास्क दरम्यान ढकल्याचा आरोप करतो. बसीर अली क्लॅपबोर्ड स्विमिंग पूलमध्ये फेकतो. दोघांना एकमेकांचा प्रचंड राग आल्याचे दिसून येते. आता अमाल मलिकच्या राज्यात 'बिग बॉस 19'च्या घरात कोणते बदल होतात, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

'बिग बॉस 19'च्या घरातून तिसऱ्या आठवड्यात 4 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

नॉमिनेट सदस्यांची नावे

  • अवेज दरबार

  • नगमा मिरजकर

  • मृदुल तिवारी

  • नतालिया जानोस्जेक

Bigg Boss 19 Third Week Captain
kamali Marathi Serial : नेहमी दोन वेण्यांवर दिसणाऱ्या 'कमळी'चा नवा लूक, फोटो पाहून चाहते पडले प्रेमात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com