'बिग बॉस 19'च्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला.
टास्कदरम्यान मृदुल तिवारी जखमी झाला.
घरात अभिषेक बजाज आणि बसीर अलीमध्ये भांडण होते.
'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात तुफान राडा झाला असून एक सदस्य गंभीर जखमी झाला आहे. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला. ज्यामध्ये सदस्यांनी घरात धुमाकूळ घातला. बिग बॉसने कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात कॅप्टन्सी टास्क खेळताना मृदुल तिवारी जखमी (Mridul Tiwari Injured ) झालेला पाहायला मिळत आहे. नेमकं झाले काय, जाणून घेऊयात.
'बिग बॉस'च्या कॅप्टन्सी टास्कमध्ये सर्वजण पळताना दिसतात. तेव्हा घरातील एक सदस्य खाली पडतो. पुढे बसीर अली आणि अभिषेक बजाज भांडण होताना दिसते. तेवढ्यात प्रोमोच्या शेवटच्या भागात मृदुल तिवारी जखमी झालेला दिसतो. टास्कच्या दरम्यान मृदुलला दुखापत होते. त्याच्या ओठातून रक्त येते. मृदुलला दुखापत होताच गौरव खन्ना आणि अवेज दरबार त्याला ताबडतोब बाथरूममध्ये घेऊन जातात. त्याला पाणी देतात.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, घराबाहेर एक मशीन बसवण्यात आली आहे. जी घराचा नवीन कॅप्टन कोण ठरवेल. टास्कसाठी घरातील सर्व सदस्य एका रांगेत उभे राहतात. त्यानंतर सर्व जोरात पळू लागतात. ज्यात अभिषेक सर्वांना धक्का देत पुढे जाताना दिसला. यामुळे अभिषेक बजाज आणि बसीर अलीमध्ये भांडण होते. गेमच्या दोन फेऱ्यांमध्ये कॅप्टनसीचा निर्णय होणार होता.
व्हिडीओमध्ये मृदुल तिवारी देखील खूप वेदनांमध्ये दिसत होता. मृदुल तिवारीला दुखापत झाल्यामुळे बिग बॉस पटकन टास्क थांबवतात. मीडिया रिपोर्टनुसार, असे बोले जात आहे की, बसीर अली घराचा नवा कॅप्टन बनला आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी पाच स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. ज्यात अवेज दरबार, मृदुल तिवारी, कुनिका सदानंद, तान्या मित्तल आणि अमाल मलिकचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.