बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी ओपन रिलेशनशिपवर आपले स्पष्ट मत मांडले आहे.
पंकज त्रिपाठी यांनी ओपन रिलेशनशिपची तुलना बँक अकाऊंटसोबत केली आहे.
नुकतेच पंकज त्रिपाठी 'मेट्रो इन दिनों' चित्रपटात दिसले.
'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) चित्रपट अलिकडेच ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. तेव्हा नेटफ्लिक्सने घेतलेल्या मुलाखतीत अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी ओपन रिलेशनशिपवर (Open Relationships) आपले स्पष्ट मत मांडले आहे. 'मेट्रो इन दिनों' हा एक रोमँटिक ड्रामा आहे. 'मेट्रो इन दिनों' 2007 साली रिलीज झालेल्या 'लाइफ इन अ मेट्रो' चा सीक्वल आहे.
पंकज त्रिपाठी ओपन रिलेशनशिपवर म्हणाले की, "नातेसंबंध आणि बँक अकाऊंट ओपन कशी राहू शकतात? ओटीपी किसी और को दे दोगे? काही गोष्टी काळानुसार बदलणे ठीक आहे. पण विकसित होण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही 3-4 नातेसंबंध बनवता." नातेसंबंध आणि बँक अकाऊंटची पंकज त्रिपाठी यांनी केलेली तुलना पाहून सर्वजण हसायला लागतात.
सारा अली खान म्हणाली की, "ज्यांना ओपन रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे त्यांनी एकाच व्यक्तीसोबत रहावे. " तर अनुपम खेर म्हणाले की, "ओपन रिलेशनशिप विचारणारा माणूस विविधता शोधत असतो." आदित्य रॉय कपूर ओपन रिलेशनशिपवर म्हणतो की, "स्वतःशी प्रामाणिक राहा... जर तुम्हाला त्याबद्दल चांगले वाटत नसेल तर ते ठीक आहे."
जेव्हा विषय माजी जोडीदारासोबतच्या मैत्रीकडे वळला तेव्हा सारा अली खान, फातिमा सना शेख आणि कोंकणा सेन शर्मा म्हणाल्या की, "हो सकता है, का नाही?" त्यावर उत्तर देत नीना गुप्ता म्हणाल्या, "इतने फ्रेंड्स हैं, बना लो ना. उस्सी को क्यू फ्रेंड बनाना है?" याच मुद्याला स्पष्ट करत कोंकणा सेन म्हणाली की, "मला वाटते की बरोबर किंवा चूक काहीही नसते.. परंतु त्यावेळी दोघेही एकाच विचारसरणीचे असले पाहिजेत."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.