Relationship Tips: नातं कसं टिकवायचं? नातेसंबंध मजबूत होण्यासाठी करा 'या' चार गोष्टी

Relationships Tips: प्रेम, समजूतदारपणा आणि वेळ हे नाते मजबूत बनवतात. पण कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यात अंतर निर्माण होऊ शकते.
Relationships Tips
Strong relationships are built on love, trust, and understanding – follow these 4 tips to keep bonds unbreakable.saam tv
Published On
Summary
  • नातं टिकवण्यासाठी प्रेम, समजूतदारपणा आणि वेळ आवश्यक.

  • छोट्या छोट्या गोष्टी नात्यात दुरावा निर्माण करतात.

  • संवाद, विश्वास आणि सहनशीलता नातं मजबूत करतात.

नाते कोणत्याही प्रकारचे असो, ते टिकवणं सोपं नसतं. पती-पत्नी असो, प्रियकर-प्रेयसी असो किंवा मित्र असो, कोणतेही नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रेम, समजूतदारपणा आणि वेळ आवश्यक असते. पण कधीकधी छोट्या छोट्या गोष्टी नात्यांवर मोठा परिणाम करत असतात. नात्यात अंतर निर्माण करतात, अशा परिस्थितीत नाते मजबूत करणं खूप महत्वाचं आहे.

एकमेकांना वेळ देणे

धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते. अशा परिस्थितीत एखाद्याला वेळ देणं अशक्य वाटत असते. जर तुम्हाला तुमचे नाते मजबूत करायचे असेल, तर वेळ द्या. कामानंतर मोबाईल किंवा टीव्हीमध्ये व्यस्त राहण्याऐवजी तुमच्या जोडीदाराला वेळ द्या. यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर दूर होईल. तुम्ही खूप वेळ काढला पाहिजे असे नाही. तर एकत्र चहा प्या, फिरायला जा. थोडा वेळ गप्पा केल्यानंतरही नाते मजबूत होऊ शकते.

Relationships Tips
Fitness After 40 : चाळीशी ओलांडली? मग फिटनेस तपासण्यासाठी फक्त ४ व्यायाम ठरतील बेस्ट

मोकळेपणाने बोला

नात्यांमध्ये अनेकदा गैरसमज वाढू लागतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला नाते टिकवायचे असेल तर एकमेंकांशी मोकळेपणाने बोला. मनात कोणतीच गोष्ट दडपून ठेवू नका. तुम्हाला काय वाटते ते समोरच्या व्यक्तीला प्रेमाने आणि आदराने सांगा. यासोबत जर ते त्यावर प्रतिक्रिया देत असतील तर ते काळजीपूर्वक ऐका.

Relationships Tips
Hair Care Tips : केस राठ झाले आहेत? नारळाचे तेल आणि कोरफडपासून बनवा घरच्या घरी हे नैसर्गिक हेअर सीरम

एकमेकांची स्तुती करा

बऱ्याचदा आपण एकमेकांची स्तुती करणं विसरत असतो. काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये आपल्याला या गोष्टींची गरजेचं वाटत नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या चुका वारंवार लक्षात येत असूनही त्यांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा. जेव्हा तुमचा जोडीदार काही चांगले करत असेल तर त्याची प्रशंसा करा.

क्षमा करायला शिका

माणसे चुका करतात. म्हणून जर तुमच्या जोडीदाराने चूक केली तर त्यावरून त्याला नेहमी टोमणे मारू नका. उलट त्यांना क्षमा करण्याचा प्रयत्न करा.

Q

नातं टिकवण्यासाठी काय सर्वात महत्त्वाचं आहे?

A

प्रेम, समजूतदारपणा, विश्वास आणि वेळ हे घटक नातं टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत

Q

नात्यात अंतर का निर्माण होतं?

A

छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष, संवादाचा अभाव आणि गैरसमज यामुळे नात्यात अंतर निर्माण होतं.

Q

नातं मजबूत करण्यासाठी कोणते उपाय करावेत?

A

एकमेकांना वेळ द्यावा, प्रामाणिकपणे संवाद साधावा, छोट्या चुका माफ कराव्यात आणि विश्वास जपावा.

Q

सर्व प्रकारची नाती टिकवण्यासाठी हेच उपाय लागू होतात का?

A

होय, मग ते पती-पत्नीचं नातं असो, प्रियकर-प्रेयसी असो किंवा मित्रत्वाचं, हेच नियम लागू होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com