Tharala Tar Mag: अर्जुन-सायलीला मारायचा महिपतचा डाव; ठरलं तर मग मालिकेत येणार थरारक ट्विस्ट

Tharala Tar Mag Marathi Serial: स्टार प्रवाह वरिल प्रसिद्ध मालिका "ठरलं तर मग" या लोकप्रिय मालिकेत २६ ऑगस्टचा भाग प्रेक्षकांसाठी भावनिक तसेच नाट्यमय ठरला.
Tharala Tar Mag
Tharala Tar MagSaam Tv
Published On

Tharala Tar Mag Marathi Serial: स्टार प्रवाह वरिल प्रसिद्ध मालिका "ठरलं तर मग" या लोकप्रिय मालिकेत २६ ऑगस्टचा भाग प्रेक्षकांसाठी भावनिक तसेच नाट्यमय ठरला. या भागात कल्पना पुन्हा एकदा सायलीच्या पाठीशी उभी राहते. अस्मिता सायलीला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतानाच कल्पना तिला ठाम उत्तर देऊन सायलीला आधार देते. त्यामुळे घरातले वातावरण अधिक तणावपूर्ण होतं.

दरम्यान, महिपत अजूनही आपले डाव रचत आहे. अर्जुन आणि सायलीला संपवण्यासाठी त्याने नवा कट आखला आहे. कोर्टाच्या माध्यमातून आणि वकिलाच्या मदतीने तो सायलीच्या आयुष्यात संकट उभं करण्याचा प्रयत्न करतो. पण अर्जुनही गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. त्याची आखलेली योजना हळूहळू यशस्वी होत चालली आहे. या योजनेतून तो महिपतला प्रत्युत्तर देतोय आणि सायलीचे रक्षण करतोय.

Tharala Tar Mag
Bigg Boss 19: बिग बॉस १९ मध्ये सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या स्पर्धकांची एकूण संपत्ती

या भागात एक गोड क्षणही प्रेक्षकांनी पाहिला. कल्पना सायलीला अर्जुनसोबत बाहेर जाण्याची परवानगी देते. त्यामुळे दोघांना थोडा वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळते. प्रेक्षकांना अर्जुन-सायलीमधील गोडी आणि जवळीक अनुभवायला मिळाली. ही दृश्यं रोमँटिक रंगत आणणारी होती. पण त्याचवेळी महिपतच्या कटांमुळे सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात आणखी वादळं येणार याचे संकेत मिळाले. अस्मिता, महिपत आणि अर्जुन- सायली यांच्यातील संघर्ष, कल्पनेचा आधार, आणि येणारी संकटं यामुळे कथानक अधिक गुंतागुंतीचं आणि उत्कंठावर्धक होत चाललं आहे.

Tharala Tar Mag
Waterproof Makeup: पावसाळ्यात मेकअप कसा टिकवायचा? जाणून घ्या 'हे' सोपे उपाय

पुढील भागात महिपतचा डाव यशस्वी ठरणार की अर्जुनची योजना उलट महिपतलाच गाठणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे. मालिकेतली ही सध्याची घडी जणू निर्णायक टप्प्याची सुरुवात असल्यासारखी आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये पुढील भागाची उत्सुकता प्रचंड वाढली असून ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दररोज रा. 8:30 वाजता पाहता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com