New Marathi Serial Video saam tv
मनोरंजन बातम्या

New Marathi Serial Video : 'आनंदी' लवकरच येतेय तुमच्या भेटीला; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत, मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

Star Pravah New Marathi Serial : स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका सुरू होणार आहे. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुख्य भूमिकेत कोण, पाहा.

Shreya Maskar

मराठी मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात.

नुकताच नवीन मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.

'स्टार प्रवाह'वर सुरू होणाऱ्या नवीन मालिकेत प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहेत.

प्रेक्षकांचे मनोरंजन करायला आणखी एक नवीन मालिका भेटीला येणार आहे. ही मालिका 'स्टार प्रवाह' वाहिनीवर सुरू होणार आहे. मालिकेचा नुकताच प्रोमो समोर आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' मालिका चांगलीच चर्चेत पाहायला मिळत आहे. प्रेक्षक मालिकेवर खूपच प्रेम करत आहे. त्यात आता नवीन मालिका येत आहे. ज्यामुळे वाहिनीचा टीआरपी चांगला पाहायला मिळत आहे.

नवीन मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहू शकता की, तीन बहिणी ब्यूटी पार्लरला येतात. त्यांना आयब्रो करायचे असतात. मालिकेची नायिका व्हिडीओत आयब्रो करताना दिसते. जेव्हा पार्लरची मुलगी त्यांना आरसा दाखवते. तेव्हा त्यांना समजते की, ती मुलगी आंधळी असते. तरी ती खूप आत्मविश्वासाने स्वतःच्या सौंदर्याचे कौतुक करते. आयब्रोचे 50 रुपये होतात म्हणून मालिकेची नायिका बरोबर पाकीटातून 100 रुपये काढून देते. आनंदीचे हे कौशल्य पाहून पार्लरची मुलीला धक्का बसतो. ती पाहतच राहते आणि चुकून पुन्हा 100 ची नोट आनंदीला देते. आनंदी नोटेला हात लावताच समजते की, ही 100 ची नोट आहे. आनंदीची हुशारी पाहून सर्वच थक्क होतात.

नवीन मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मराठी मालिका सुरू होत आहे. या मालिकेचे नाव 'आनंदी' असे आहे. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर 16 मार्च 2026 (सोमवार) पासून सुरू होणार आहे. मालिकेची वेळ अद्याप जाहीर झाली नाही. नवीन मालिकेच्या प्रोमोला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. त्यांनी लिहिलं की, "घेऊन येतेय सुखाची नांदी..."

मालिकेची स्टारकास्ट

'आनंदी' मुख्य भूमिकेत म्हणजे आनंदीच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री जाई खांडेकर दिसणार आहे. जाई 'भूमिका' या नाटकामुळे प्रेक्षकांच्या घरात पोहचली आहे. तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेत 'आनंदी'च्या बहि‍णींच्या भूमिकेत दोन प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार आहेत. पहिली अभिनेत्री म्हणजे 'नवरी मिळे हिटलरला' फेम आलापिनी निसळ होय. चाहते नवीन मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत. जाईसोबत मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता असणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

SCROLL FOR NEXT