Sakshi Sunil Jadhav
सुंदर चेहऱ्याच्या सौंदर्यात भुवया महत्त्वाची भूमिका बजावतात. दाट, कोरीव भुवया असतील तर डोळ्यांचे सौंदर्य जास्त उठून दिसतं. अनेक महिला पातळ भुवयांमुळे महागड्या आयब्रो पेन्सिल, मायक्रोब्लेडिंगसारख्या ट्रिटमेंटचा वापर करतात.
टी ट्री ऑइल भुवयांच्या केसांची छिद्रं उघडतात आणि नवीन केस वाढवतात. रात्री झोपण्याआधी भुवयांना लावल्याने उत्तम परिणाम दिसतात.
नारळाचं तेल केसांच्या मुळांना मॉइश्चरायझ करते. रोज भुवयांना हलक्या हाताने मालिश केल्यावर त्या जाड आणि दाट होतात.
लॅव्हेंडर तेलामुळे केसांची वाढ नैसर्गिकरीत्या वाढते. रोज भुवयांभोवती हलक्या हाताने मालिश केल्यास फरक जाणवतो.
एरंडेल तेलात असणारे रिसिनोलेइक ॲसिड आणि फॅटी ॲसिड्स केसांच्या मुळांना पोषण देतात. यामुळे नवीन केस लवकर उगवतात.
कोणतंही तेल लावल्यानंतर 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. याने रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांची वाढ होते.
सतत आयब्रो पेन्सिल वापरल्याने भुवयांचे नैसर्गिक केस कमजोर होऊ शकतात. शक्यतो घरगुती उपायांवर भर द्या.
हे उपाय एक-दोन दिवस करून चालत नाहीत. किमान 3 ते 4 आठवडे नियमित वापर केल्यावर चांगला परिणाम दिसून येतो.
हे सर्व तेल नैसर्गिक असल्याने त्वचेला फारसा त्रास होत नाही आणि भुवया सुंदर, दाट व रेखीव दिसू लागतात.