New Marathi Serial  SAAM TV
मनोरंजन बातम्या

New Marathi Serial : 'स्टार प्रवाह'वर येतेय नवीकोरी मालिका; लोकप्रिय अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत, सिरीयलचे नाव काय?

Star Pravah New Serial : स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सुभेदार' फेम अभिनेता खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

Shreya Maskar

स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नवीन मालिकेच्या प्रोमोनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नवीन मालिकेत 'सुभेदार' फेम अभिनेता अजय पूरकर खलनायकाची भूमिकेत दिसणार आहे.

प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवर लवकरच आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेता अजय पूरकर (Ajay Poorkar) आणि अभिनेत्री नेहा नाईक मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अजय पूरकरसोबत प्रोमोमध्ये अभिनेत्री प्राजक्ता केळकर देखील दिसत आहे.

नवीन मालिकेत अजय पूरकर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 'सुभेदार' चित्रपटात या अभिनेत्याने काम केले आहे. मालिकेत नागेश्वर घोरपडे हे त्याच्या पात्राचे नाव आहे. या नव्याकोऱ्या मालिकेचे नाव 'नशीबवान' (Nashibvaan ) असे आहे. अद्याप मालिकेचे कोणतेही रिलीज अपडेट समोर आले नाही आहेत. प्रेक्षकांची आणखीन एक कथा वाट पाहत आहे.

'नशीबवान' च्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अजय पूरकर गोकुळाष्टमीचा पाळणा गाताना दिसत आहेत. तेवढ्यात एक गुरुजी येतात आणि भविष्यवाणी करतात. ज्यामुळे नागेश्वर घोरपडेचा संताप होताना दिसत आहे. गुरुजी म्हणतात की, "पत्रिकेप्रमाणे तुमच्या नशीबाचे फासे उलटे पडायला सुरुवात झाली आहे. हे सगळे ज्याचे आहे त्याच्याकडे जाणार आहे. तुम्ही लवकर रस्त्यावर येणार आहात. " त्यावर नागेश्वर घोरपडे म्हणतो की, "सणासुदीला अपशकुन केला गुरुजी तुम्ही...अहो जिथे आई-बापाला गाडले, तेव्हा पोरीची काय बिशाद आहे? घाबरू नका गुरुजी आज नाही मारणार तुम्हाला...सांगून झोपवणार"

प्रोमोच्या दुसऱ्या टप्प्यात एक मुलगी आपल्या वडिलांना शोधत दारूच्या गुत्त्यावर आली आहे. ती आपल्या बापाला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. मात्र बाप तिला ढकलून देतो आणि म्हणतो की, "म्या तुझा बाप नाही आहे. रस्त्यावर उचलून आणली आहे तुला. " मग नेहा नाईक विचारते की, माझे आई-बाबा कुठे आहेत? 'नशीबवान' मालिकेच्या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Koli: युट्यूब स्टार 'मोस्टलीसेन'चा नवा लूक पाहिलात का? चाहत्यांना लवकरच देणार नवं सरप्राईज

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये दोन ST बसेसची समोरासमोर धडक

Shivaji Park : शिवाजी पार्कमध्ये किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी भडकले

Travel Insurance: रेल्वे प्रवाशांनो लक्ष असू द्या! फक्त ४५ पैशांत मिळवा १० लाखांचा प्रवास विमा, कसा ते वाचा सविस्तर...

Leopard Attack : बाजारातून परत जाताना बिबट्याचा हल्ला; वृद्ध महिला गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT