
भारतामध्ये पूर्वी हिऱ्यांच्या खाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं म्हटलं जातं होतं. आजही मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात हीरे सापडतात. हे असं एक ठिकाण आहे, जिथं कधी कुणाचं नशीब चमकेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार पन्ना जिल्ह्यात नुकताच घडला आहे. मंगळवारी एका मजुराला खाणीत काम करताना मौल्यवान हिरा सापडला. या हिऱ्यामुळे त्या सामान्य मजुराचं नशीब रातोरात चमकलं.
माधव आदिवासी या तरूणाला मौल्यवान हिरा सापडला आहे. पन्नाच्या कृष्णा कल्याणपूर पट्टी येथील खाणीत तो मजूर म्हणून काम करत होता. आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पहिल्यांदाच खाण खोदली. पहिल्याच दिवशी खाण खोदल्यानंतर त्याला हिरा सापडला आहे. या मजुराने मंगळवारी खाण खोदण्यास सुरूवात केली. पहिल्याच दिवशी त्याला ११ कॅरेट ९५ सेंटचा चमकदार हिरा दिसला. त्याने आणखी खोदले. तेव्हा त्याला हिरा सापडला.
याबाबत माहिती देताना हिरा अधिकारी रवी पटेल म्हणाले की, 'माधव यांना सापडलेला हिरा अतिशय मौल्यवान आहे. हिऱ्याची पारख केल्यानंतर त्याची किंमत अंदाजे ४० लाखाहून अधिक असायला हवी. हिरा मिळाल्यानंतर माधव यांनी नियमांनुसार तो पन्ना येथील हिरे कार्यालयात जमा केला. हिऱ्याचा नंतर लिलाव केला जाईल. लिलावाच्या रकमेतून १२.५ टक्के रॉयल्टी वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम माधव यांना दिला जाईल'.
पन्ना जिल्ह्याला 'भारताचं हिरा शहर' असंही ओळखलं जातं. इथे अनेकांना काम करत असताना हिरे सापडल्याची उदाहरणं आहेत. मात्र, माधवच्या कठोर परिश्रमामुळे त्याचं नशीब उजळलं आणि हे उदाहरण इतर मजुरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. एका सामान्य आदिवासी तरुणाचं जीवन एका क्षणात पालटलं, एवढं मात्र नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.