Marathi Serial Off Air SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, ४ वर्षांचा प्रवास अखेर थांबला

Star Pravah Serial Off Air : स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

Shreya Maskar

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच 'काजळमाया' ही हॉरर मालिका सुरू होणार आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

स्टार प्रवाहवरील मालिकांची वेळ बदलण्यात आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून 'काजळमाया' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर एका लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका दुसरी-तिसरी कोणती नसून 'अबोली'आहे. 'अबोली' मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आहे.

'अबोली' मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि अभिनेता सचित पाटील एकत्र झळकले होते. 2021 मध्ये 'अबोली' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता 4 वर्षांनी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेचे 1200 हून अधिक एपिसोड झाले आहेत. मालिकेच्या शेवटच्या दिवसाचा खास व्हिडीओ अभिनेत्री गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करून तिने सर्वांचे आभार मानले आहे. "अबोली या मालिकेवर भरभरून प्रेम केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार..." असे कॅप्शन तिने व्हिडीओला दिले आहे.

'अबोली' मालिका रात्री 11 वाजता प्रसारित व्हायची. आजपासून (27 ऑक्टोबर) मात्र रात्री 10:30 वाजता अक्षय केळकरची 'काजळमाया' ही मालिका सुरू होणार आहे. 'काजळमाया' (kajalmaya) ही हॉरर मालिका आहे. या मालिकेत अक्षय केळकर, रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या हॉरर मालिकेत 300 वर्षांपूर्वीची कहाणी पाहायला मिळणार आहे.

मालिकांची वेळ बदलली

27 ऑक्टोबर पासून तुमच्या आवडत्या मालिकांचे वेळ देखील बदलली आहे. 'तू ही रे माझा मितवा' मालिका रात्री 8 वाजता आणि 'कोण होतीस तू, काय झालीस तू!' ही मालिका रात्री 11 वाजता पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vivah 2025: तुळसी विवाह कधी आहे? जाणून घ्या तारीख अन् शुभ मुहूर्त

Heart Health: निरोगी हृदय ठेवायचं आहे? तर आजच फॉलो करा 'या' चांगल्या सवयी

Maharashtra Live News Update: रत्नागिरी- समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा गणपतीपुळेला फटका

तिशीनंतर हाडांचं दुखणं वाढलंय? रोज खा '१' पदार्थ; दुधापेक्षाही दुप्पट कॅल्शियम मिळेल

Maharashtra Cyclone Alert : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही तास धोक्याचे, वाचा IMD ने काय इशारा दिला?

SCROLL FOR NEXT