SSMB 29 SAAM TV
मनोरंजन बातम्या

SSMB 29 : राजामौलींनी वाराणसी उभारली हैदराबादमध्ये; 'बाहुबली'पेक्षा भव्यदिव्य सेट, फोटो पाहून डोळे विस्फारतील

SS Rajamouli Building a Set For SSMB 29 : एसएस राजामौली 'एसएसएमबी २९' चित्रपटासाठी भव्य सेट उभारत आहे. ज्याची किंमत किती, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

लोकप्रिय दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli ) यांचा 'एसएसएमबी २९' (SSMB 29) चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. सध्या चित्रपटाचे कलाकार शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) पहिल्यांदा एकत्र झळकणार आहेत. नुकतीच या चित्रपटासंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

'एसएसएमबी २९' या चित्रपटासाठी एसएस राजामौली भव्य सेट उभारत आहेत. एसएस राजामौली यांच्या चित्रपटात राजशाही थाट, भव्यदिव्य सेट कायम पाहायला मिळतात. 'एसएसएमबी २९' चित्रपटाच्या नवीन सेटचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

'एसएसएमबी २९' चित्रपटासाठी हैदराबादमध्ये (Hyderabad ) भव्य सेट उभारण्यात येत आहे. 'वाराणसी'चा (Varanasi ) हा भव्य सेट असणार आहे. यात घाट, मंदिरे पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात बराचसा भाग वाराणसीमधील असल्यामुळे हा भव्य सेट उभारण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हा भव्य सेट हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये (Ramoji Film City) तयार करण्यात येत आहे. यासाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वात महागडा सेट असल्याचे बोले जात आहे. यामुळे 'एसएसएमबी २९' पाहण्यासाठी आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'एसएसएमबी २९' चित्रपटाचे आतापर्यंत दोन शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहेत. महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिल्ली घटनेचे नांदेडमध्ये पडसाद

Bogus Voting Issue: बोगस मतदानाविरोधात 'इंडिया'ची वज्रमूठ, आयोगाविरोधात 300 खासदार रस्त्यावर

Patriotic Films: स्वातंत्र्यदिनी नक्की बघा 'हे' मनात देशभक्ती जागवणारे चित्रपट

Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार

Rohit Sharma: रोहित शर्माने घेतली ५ कोटींची आलिशान कार; नंबर प्लेट ३०१५ का?

SCROLL FOR NEXT