'आमच्या देशात विराट कोहली आहे, पण शुबमन गिल...' हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर जडेजा गुजरातच्या कॅप्टनविषयी नेमकं काय म्हणाला?

GT Vs SRH IPL 2025 : गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यामध्ये शुबमन गिलने २०० च्या स्ट्राईक रेटने ३८ चेंडूत ७६ धावा केल्या. या सामन्यानंतर जडेजाने शुबमन गिलचे कौतुक केले.
Shubman Gill
Shubman Gill X
Published On

Shubman Gill : गुजरात टायटन्सचे आघाडीचे तिन्ही खेळाडू IPL 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. साई सुदर्शन, शुबमन गिल आणि जोस बटलर तिघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. हे तिघेही ऑरेंज कॅपच्या यादीत आहेत. गिलने यंदाच्या सीझनमध्ये ४४६५ धावा केल्या आहेत. कालच्या (२ मे) गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्यात शुबमन गिलने ७६ धावा केल्या.

शुबमन गिलने मागील ६ आयपीएल सीझन्समध्ये ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २०२३ मध्ये त्याने सर्वाधिक ८९० धावांचा यशस्वी विक्रम रचला होता. सततच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे त्याची तुलना विराट कोहलीशी केली जात आहे. गिल हा विराटचा उत्तराधिकारी आहे असेही काहीजण म्हणत असतात. जिओहॉटस्टारवर बोलताना माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी गिलच्या जबरदस्त फॉर्मचे कौतुक केले.

Shubman Gill
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्याला दुखापत? RCB Vs CSK सामन्याआधी फोटो आला समोर; खेळण्यावर प्रश्नचिन्ह

गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्याच्यानंतर अजय जडेजा यांनी गिलची तुलना विराट कोहलीशी केली. ते म्हणाले, 'शुबमन गिल नेहमीच चांगली खेळी करतो. त्याचा खेळीत सातत्य पाहायला मिळते. आपल्या देशात विराट कोहली आहे, पण गिलही काही कमी नाही. जर तुम्ही गिलच्या धावा काढण्याच्या सातत्येकडे पाहिले, तर ती शैली विराट कोहलीप्रमाणेच आहे. कौशल्याच्या बाबतीत गिल उत्कृष्ट फलंदाज आहे. परिस्थिती सांभाळून तो फलंदाजी करतो. गरज नसताना चुकीचा शॉट मारुन तो बाद झाला हे फारच क्वचित पाहायला मिळते.'

Shubman Gill
Virat Kohli: माझा कोणताही हेतू नव्हता! अभिनेत्रीचा फोटो लाईक करण्यावर विराटचं स्पष्टीकरण

आयपीएल २०२५ मधील ५१ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातचा कॅप्टन शुबमन गिलने तब्बल दोनदा हुज्जत घातली. फलंदाजी दरम्यान शुबमनने रनआउटच्या मुद्द्यावरुन थेट चौथ्या अंपायरसोबत राडा घातला. त्यानंतर हैदराबादची फलंदाजी असताना अभिषेक शर्माच्या पॅडच्या चेंडू लागल्यानंतरही शुबमन गिल भडकला. एकाच सामन्यात दोन वेळा अंपायर्ससोबत बाचाबाची केल्याने गिलवर नक्कीच कारवाई होऊ शकते असे म्हटले जात आहे.

Shubman Gill
CSK ला हरवलं तरीही RCB ला मिळणार नाही प्लेऑफचं तिकीट; १६ गुण मिळाले तरी फायदा नाही, कसं आहे क्वालिफायचं गणित?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com