Devara OTT Deal canva
मनोरंजन बातम्या

Devara OTT Deal: रिलीजआधी जान्हवीच्या चित्रपटाने कमावले १५० कोटी

Devra Movie OTT Rights: साउथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून २ बॉलिवूड कलाकाराचं टॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे. 'देवरा' चित्रपटाच्या गाण्यांमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजामौलीच्या RRR चित्रपटानंतर साउथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झालाय. ज्युनिअर एनटीआरचा बहुप्रतिक्षित 'देवरा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनेक पोस्टर्स आणि गाणी सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहेत. चित्रपटाच्या गाण्यानी यूट्युबवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटामधील गाणी पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 'देवरा' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांनी टॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.

ज्युनिअर एनटीआरच्या देवरा चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. माहितीनुसार, नेटफ्लिक्सने देवरा या चित्रपटाचे राईट्स १५० कोटींना विकत घेतले आहेत. या चित्रपटाला मिळालेलं मानधन सर्व टॉलिवूड चित्रपटांपेक्षा अधिक असल्याचे कळत आहे. निर्मात्यांकडून चित्रपटाचा रनटाइम ३ तास १० मिनिटे असेल असे सांगण्यात आले आहे.

'देवरा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची ॲडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आली आहे. कोराताला शिवा यांनी दिग्दर्शित केलेला 'देवरा' चित्रपटाच्या १५००० तिकिटांची बुकिंग प्रदर्शित होण्यापूर्वी झाली आहे. यूएसमध्ये चित्रपटाच्या प्री-सेल कलेक्शनने दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे, यामुळे चित्रपटाची 1 मिलियन डॉलरची ओपनिंग मेकर्सकडून निश्चित मानली जात आहे.

'देवरा' हा जूनियर एनटीआरचा ३०वा चित्रपट आहे. जूनियर एनटीआर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआरची दुहेरी भूमिका चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ज्यूनिअर एनटीआरने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्युनिअर एनटीआरच्या पोस्टमुळे चाहत्यांना चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेता सैफ अली खान या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. रम्या कृष्णा, प्रकाश राज, श्रीकांत, श्रुती मराठे, नारायण, शाइन टॉम चाको आणि अभिमयू सिंग हे कलाकार देखील चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT